मेष (Aries) : विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. उधार देण्यापासून सावध राहा. व्यवसाय आणि धनप्राप्तीसाठी दिवस संमिक्ष स्वरुपाचा असेल. पोटाचे आजार उद्भवतील. आहाराकडे लक्ष द्या अन्यथा विकार होण्याची शक्यता आहे. सहकार्यांना मदत केल्याने नवं काही शिकायला मिळेल.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ (Taurus) : पाल्याच्या मदतीने आनंद द्विगुणित होईल. इश्वराच्या नामस्मरणामुळे मानसिक शांती लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात सातत्यापूर्ण प्रयत्नांमुळे विशेष व्यक्तीचं मार्गदर्शन मिळू शकतं. कुटुंबियाकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. 


मिथुन (Gemini) : नोकरदार वर्गाला यश मिळेल. पदोन्नती संदर्भात बोलणं होईल. पाल्य गौरव वाटेल असं काही करेल. दिवसाची सुरुवात चांगली असेल. आई-वडिलांचं प्रेम लाभेल. आर्थिक लाभ होईल.


कर्क (Cacncer) : वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. कुटुंबिय अथवा मित्रपरिवारासोबत वेळ घालवाल.  मंगळ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नातेवाईकांशी भेट होईल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहिल. 


सिंह (Leo) : कामच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खोटेनाटे आरोप होऊ शकतात. वादापासून वाचून राहा. मित्र आणि ओळखीतल्यांसह वेळ घालवाल. 


कन्या (Virgo) : आरोग्य सामन्य असेल. व्यवसायात वाढ होण्याचा योग आहे. तुमचा सल्ला दुसऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. घरी-बाहेर प्रसन्न वातावरण राहिल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.  


तुळ (Libra) : फिरण्यासाठी घराबाहेर पडाल, ज्यामुळे तुमचं भरपूर मनोरंजन होईल. कामात स्वत:ला झोकून द्याल. प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल. चांगली बातमी कानावर येणार. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक (Scorpio) : तुमच्यातील प्रतिभेमुळे तुमचं नशीब फळफळेल. सर्व कामात यश मिळेल. प्रेम संबंधात संवदेनशीलता पाहायला मिळेल. महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या जोडीदारासह शेअर करा.


धनु (Sagittarius) : भाग्य तुमच्या सोबत असेल. मानसिक थकवा नाहीसा होईल. गोड बातमी मिळेल. पदोन्नतीसाठी जीव तोडून मेहनत कराल. संपूर्ण दिवस प्रसन्न राहिल.


मकर (Capricorn) : भाग्य तुमच्यासोबत आहे. कुटुंबिय प्रसन्न असतील. तुम्ही असं काही काम करु शकता, ज्यामुळे कुटुंबियांना तुमचा अभिमान वाटेल. दिवसभपर प्रसन्न राहाल. 


कुंभ (Aquarius) : तब्येत साधारण राहिल. कामकाजात यशस्वी व्हाल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत वेळ घालवाल. रागावर नियंत्रण ठेवा.  


मीन (Pisces) : आरोग्य उत्तम राहिल. दुसऱ्यांसोबत व्यवहार चांगला राहिल. परदेश दौऱ्याचा आनंद घ्याल. कामानिमित्ताने दूरचा प्रवास होऊ शकतो. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. स्कीम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकता.