मुंबई : अनेक राशींसाठी सोमवारचा दिवस शुभ राहणार असून कामात लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची रास कोणती आहे आणि जाणून तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी नशीब तुमच्या सोबत आहे. कामात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. सोमवारी भाग्य तुम्हाला साथ देईल. 


शुभ रंग: आकाशी


शुभ क्रमांक: 21


वृषभ (Taurus)


सोमवारी तुम्ही उत्साहाने भरलेले दिसाल, नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.


शुभ रंग: राखाडी


शुभ क्रमांक: 3


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस उत्तम राहील. तुमची बुद्धिमत्ता आणि कामावरील निष्ठेचं अधिकारी कौतुक करतील. अनेक छोटी गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. 


शुभ रंग: तपकिरी


शुभ क्रमांक: 7


कर्क (Cancer) 


तुम्ही तुमचं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वत:ला मजबूत समजाल. हुशारीने काम करा. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. 


शुभ रंग: क्रीम


शुभ क्रमांक: 16


सिंह (Leo) 


सोमवारचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. आपली कमाई सावधगिरीने खर्च करा. कुटुंबातील सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न कराल. गाडी चालवताना काळजी घ्या.


शुभ रंग: पिवळा


शुभ क्रमांक: 12


कन्या (Virgo) 


बुद्धीमत्ता आणि हुशारीच्या जोरावर सहजपणे काम पूर्ण कराल. तुमच्या बोलण्याने मित्र आणि नातेवाईक तुमच्यावर आनंदी असतील. शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.  


शुभ रंग: काळा


शुभ क्रमांक: 1


तुळ (Libra) 


सोमवारी आपल्या इच्छा दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. चांगल्या लोकांशी संबंध निर्माण होतील. 


 


भ रंग: जांभळा


शुभ क्रमांक: 6


वृश्चिक (Scorpio) 


सोमवारी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. घरी पाहुणे येतील, ज्यामुळे आनंदाचं वातावरण असेल. वडिलधाऱ्यांप्रती मनात आदराची भावना राहिल. 


शुभ रंग: सोनेरी


शुभ क्रमांक: 5


धनु (Sagittarius) 


सोमवारची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी तुमचा दिवस चांगला जाणार आहे. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो.


 


शुभ रंग: पिवळा


शुभ क्रमांक: 6


मकर (Capricorn) 


आरोग्याबाबत हलगर्जीपणा करु नका. मन लावून काम कराल. मित्राच्या मदतीने तुम्हाला धनलाभ होईल.   


शुभ रंग: गुलाबी


शुभ क्रमांक: 11


कुंभ (Aquarius) 


तुमच्या विरोधकांना वरचढ होऊ देऊ नका. भाग्य तुमच्यासोबत आहे. कुटुंबिय किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. 


शुभ रंग: जांभळा


शुभ क्रमांक: 2


मीन (Pisces) 


दिवसाची चांगली सुरुवात होईल. प्रकृती स्थिर राहिल. उत्साहाने कामं पूर्ण कराल.  


शुभ रंग: लाल


शुभ क्रमांक: 6