मेष -  आज काही कामातून समाधान मिळेल. संपत्ती खरेदी करण्याचा योग आहे. जमिनीच्या कामातून फायदा होईल. आपल्या इच्छा पूर्णत्वाला जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - एखादे छानसे पुस्तक वाचा. मन कसे आनंदी राहील. दिवस एकदम मजेत जाईल. मनावरील ताण कमी होईल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. 


मिथुन - आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. दिवस खेळीमेळीत जाईल.  कौटुंबिक वातावरणात रमाल. आज तुम्हाला आराम मिळेल. त्यामुळे नव्याने काम करण्यासाठी उत्साह मिळेल.



कर्क -  जोडीदाराला प्राधान्य द्यावे. किरकोळ गैरसमज दूर करावेत. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले राहिले. चिडचिड करुन त्याचा काहीही उपयोग होणार नाही.


सिंह - काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.


कन्या - विरोधकांचा विरोध मावळेल आणि अडचणीतून मार्ग काढता येईल. कौटुंबिक वाद होणार नाही, याकडे जास्त लक्ष द्या.


तूळ - आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. सुरु असलेल्या कामात यश येईल. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.


वृश्चिक - आज आपल्याला मित्रांचा सहवास या ना कारणाने लाभू शकतो. फोनवर एकमेकांची चौकशी करण्यात वेळ  जाईल. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.


धनु - थोडीसी आर्थिक चणचण आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कसे करायाचे यावर भर दिला पाहिजे. एकादी चिंता सतावत राहिल. तुम्ही जास्त काळजी करु नका. सगळे काही व्यवस्थित होईल.


मकर - आपल्याला अधिकार गाजविण्याची संधी मिळेल.  मात्र, त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. जोडीदाराचे मत विचारात घ्या.  


कुंभ - कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे आवश्यकता नसेल तर प्रवास करु नका. एखाद्या वादात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही लांबच राहा.


मीन - कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्या. आज आपल्याला मनाजोगे जगता येईल. आपली आवड जपण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.