Horoscope 30 January 2025: 30 जानेवारीचा हा दिवस काही राशींसाठी खास ठरणार असून, काही राशींसाठी अनपेक्षित गोष्टींचा आणि घडामोडींचा ठरणार आहे. पाहा वेध भविष्याचा ... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष 
व्यवसाय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा षअसणार आहे. नोकरदार वर्गासाठी आज नव्या संधी कारकिर्दीत मोठं यश गाठण्यासाठी हातभार लावून जातील. 


वृषभ 
नोकरी, करिअर आणि खासगी आयुष्याच्या दृष्टीनं वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. आर्थिक लाभाची शक्यता असून, नोकरदार वर्गाला आनंदवार्ता मिळणार आहे. 


मिथुन 
मिथुन राशीच्या मंडळींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर विशेष लक्ष द्या. व्यवसाय क्षेत्रात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस संमिश्र कार्यकाळाचा असेल. 


कर्क 
कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असून, आरोग्याची काळजी घेणं फायद्याचं ठरेल. आजच्या दिवशी व्यापाऱ्यांनी सतर्क राहावं. एखादी उधार घेणं टाळावं. 


सिंह 
सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आरोग्याची काळजी आणि योग्य आहाराच्या बळावर एका सुदृढ जीवनशैलीच्या दृष्टीनं तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल. आज एकाग्रतेनं काम कराल. 


कन्या 
मित्रपरिवाराला भेटण्यासमवेत याच मित्रांची एखाद्या मोठ्या कामात मदत होणार आहे. आज मोठ्य़ांचे आशीर्वाद मिळतील. प्रवासयोग नाकारते येत नाही. 


तूळ 
तूळ राशींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकदार वर्गाला पगारवाढीचे संकेत मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. 


वृश्चिक 
आज वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसाय क्षेत्रात तुमच्याकडे प्रगतीची संधी चालून येईल. आज मित्रांची आणि कुटुंबीयांची भेट घडेल. 


धनु 
मोठ्यांचा सल्ला आज तुम्हाला एका मोठ्या अडचणीतून तरुन जाण्याची ताकद देतील. व्यवसाय क्षेत्रात काही नवे आणि महत्त्वाचे निर्णय घ्याल. याच निर्णयांच्या बळावर तुम्हाला प्रगतीच्या नव्या वाटा गवसतील. 


मकर 
नव्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील. नोकरीच्या क्षेत्रात एखाद्या नव्या ठिकाणी तुमच्या कामाचा ठसा उमटवण्याची संधी मिळेल. आज शब्द जपून वापरा. हा दिवस भाग्योदयाचा ठरू शकतो. 


कुंभ 
आज तुम्हाला भाग्याची साथ आणि सहकार्य मिळेल. एखादी शुभवार्ता तुमच्या प्रतीक्षेत आहे. आरोग्याच्या कोणत्याही अडचणी आज कुंभ राशीला सतावणार नाहीत.


हेसुद्धा वाचा : Eye Blinking Astrology: डोळे फडफडल्याने काय होते? पुरुषांची डोळे फडफले तर.


मीन 
मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रवासयोग संभवतो. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ तुम्हाला नवी प्रेरणा देईल. आज आप्तेष्ठांची मोठी मदत होईल. 


(Disclaimer - वरील संदर्भ ज्योतिष शास्त्रावर आधारित असून केवळ झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)