मेष : शुक्रवारी दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होणार आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांसोबत केलेल्या कामातही तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. कोणताही निर्णय घेण्याआधी कुटुंबाकडून सल्ला घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ: शुक्रवारी चपळाईने तुम्ही तुमचं प्रत्येक काम अगदी सहजतेने पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळणार आहे. नोकरीत कोणाच्या तरी मदतीने काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. 


मिथुन : आजच्या दिवशी तुम्ही भाग्यवान होणार आहात. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जाल. आरोग्याच्या दृष्टीनेही तुमचा दिवस चांगला असणार आहे


कर्क : शुक्रवारी  विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. तुमचं आरोग्य चांगल राहणार आहे. नोकरी किंवा बिझनेस दोन्हीमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. 


सिंह : या शुक्रवारी , तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.


कन्या : शुक्रवारी  तुम्ही हुशारीने दाखवून तुमची कामं सहज पूर्ण कराल. तुमच्या बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा येईल. तुमच्या घरातील कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल.


तूळ : शुक्रवारी  तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहणार आहे. वातवरणातील बदलामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे विचारपूर्वक बोला.


वृश्चिक : आजच्या दिवशी तुम्हाला कामात चांगलं यश मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीची आणि नशिबाची साथ प्रत्येक प्रकारे मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराची साथ मिळेल. 


धनु :  या शुक्रवारी  तुमचं वर्तन अतिशय सौम्य असेल. तुमच्या वागण्यातला बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. 


मकर : शुक्रवारी  तुमचं नशीब चांगलं राहणार आहे. तुम्ही तुमच्या मित्र आणि ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन बिझनेस प्लॅनवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. 


कुंभ :शुक्रवार कामासाठी चांगला दिवस आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये नक्कीच अपेक्षित यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. अचानक खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा दिवस चांगला जाणार आहे.


मीन : शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असणार आहात. तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल. त्याचप्रमाणे प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे विचारपूर्वक बोला.