मेष :  आज नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करा. करिअरच्या क्षेत्रातील कमतरता ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. जर व्यावसायिक प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर योजनेनुसार जा. टाळू नका. विद्यार्थ्यांना आव्हानांचा सामना कराला लागेल. त्यामुळे खचून जाऊ नका. मेहनतीचं पळ नक्कीचं मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ: सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकांना ट्रान्सफर लेटर मिळू शकेल. व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नये, चुकीच्या मार्गावर जाणे योग्य नाही. आजाराने त्रस्त असलेल्यांनी आपल्या मनात नकारात्मक विचार आणू नयेत. असे विचार येत असतील तर ध्यान करा, आराम मिळेल. सकारात्मक राहा. 


मिथुन : कामाच्या ठिकाणी विचार करून काम करा. चुका लक्षात घेऊन तुमचं काम दुसऱ्या कोणाला मिळू शकतं. घरातील छोटे कार्यक्रमही सण म्हणून सर्वांसोबत थाटामाटात साजरे करा. आहारातील बदल आणि ऋतूतील बदलामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकेल, त्यामुळे बदलत्या ऋतूंमध्ये अन्न संतुलित ठेवा.


कर्क : आज तुम्हाला तुमच्या कंपनीला मोठ्या ठिकाणी रिप्रेजेन्ट करण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. मोठ्या व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षत घेऊन बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. कुटुंबात मुलांच्या विवाहाबाबत चिंतन होईल, मुले विवाहास पात्र असतील तर या दिशेने विचार होणे स्वाभाविक आहे. आज तुम्हाला शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. व्यायाम करण्याऐवजी, विश्रांती घ्या आणि स्ट्रेंथ ड्रिंक्स घ्या.


सिंह : मोठ्या समस्या संयमाने सोडवता येतील. आज युवकांना जुन्या मित्रांच्या भेटीने आनंद वाटेल. जुन्या मित्रांमध्ये जी आपुलकी असते ती नव्या माणसांमध्ये आढळत नाही. घरातील प्रलंबित कामे वाढली असतील तर त्यांची यादी तयार करा आणि ती प्राधान्याने पूर्ण करत रहा. डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कंप्यूटरवर अधिक काम करत असल्यामुळे डोळ्यांकडे विशेष लक्ष द्या. 


कन्या : घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. कोर्टातल्या गोष्टींपासून दूर राहा. कोणालाही काहीही सांगताना विचार करा. गुपित गोष्ट जवळच्या व्यक्ती शिवाय कोणालाही सांगू नका. तरुणांना आव्हानांचा सामना  करावा लागेल. 


तूळ: तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही सन्मानीत व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. धनलाभाचे नवीन मार्ग दिसतील. कामात यश प्राप्त होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. येणारा काळ उत्तम असणार आहे. 


वृश्चिक :  तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.  स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या स्वभावामुळे नात्यात विश्वास निर्माण होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत लोकांकरता शुभ दिवस.


धनु :  दिनचर्येत मोठा बदल करा. तुमची आवड आज तुम्हाला पुढे नेण्यास मदत करणार आहे. नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा.  आज नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे लक्ष द्या.  शिक्षणात उत्तम नशिबाची साथ मिळणार आहे. विवाहितांना संतती सुख लवकरच मिळेल. 


मकर : नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास ठरेल. रिअल इस्टेट लोकांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे. 


कुंभ : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे. 


मीन : आजचा दिवस उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रगती करण्याची सुवर्णसंधी. पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक बांधिलकी जपाल. कुटुंबाकडून सकारात्मक विचार तुमच्यासोबत असतील याचा अनुभव येईल.