मुंबई : आज कर्क आणि मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आज कन्या आणि कुंभ राशीच्या वयक्तींनी चंद्र आणि शनीच्या संक्रमणामुळे नोकरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं आहे.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याच्या बाबतीत लाभ होऊ शकतो. त्याचसोबत प्रवासाची शक्यता आहे. लाल आणि पिवळा हे चांगले रंग आहेत. 


वृषभ


बँकिंग क्षेत्रासाठी आजचा दिवस यशाचा आहे. कुठे अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल करू शकता


मिथुन


नोकरीतील कोणत्याही बदलांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकता. निळा रंग शुभ ठरू शकतो.


कर्क


या राशीच्या व्यक्ती आज धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी हिरवा रंग शुभ असून तांदूळ दान करा.


सिंह


या राशीच्या व्यक्तींना नोकरीत काही नवीन जबाबदाऱ्यामुळे फायदा होईल. आज कोणत्याही प्रवासाची योजना पुढे ढकलणं योग्य नाही. पिवळा रंग आज शुभ आहे.


कन्या


नोकरीत यश मिळाल्याने आज तुम्ही आनंदी राहाल. कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर त्या पैशातून फायदा होऊ शकतो.


तूळ


या राशीच्या व्यक्तींना आज नोकरीत बढती मिळण्याची बातमी मिळू शकते. घरच्या कामांमध्ये वडिलांची मदत मिळणार आहे. 


वृश्चिक


राजकारण्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मेष आणि मकर राशीचे मित्र आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहे.


धनू


कुटुंबाबाबत काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत. हिरवा आणि निळा रंग आज शुभ ठरू शकतो.


मकर


या राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्या. याशिवाय व्यवसायात यश मिळणार आहे. नोकरीतील बदलाशी संबंधित कोणत्याही निर्णयाबाबत तुम्ही गोंधळात सापडू शकता.


कुंभ 


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील. त्याचप्रमाणे व्यवसायात नवीन गोष्टी सुरू होतील. 


मीन


या राशीच्या व्यक्तींची व्यवसायात प्रगती होणार आहे. प्रवासाचे संकेत असून कुटुंबात काही तणाव संभवू शकतो.