Gangajal Upay: गंगाजल तोडगा वापरा आणि करिअरमध्ये मिळवा असा फायदा!
Gangajal Todga: हिंदू धर्मात गंगा ही सर्वात पवित्र नदी (Ganga River) आहे. गंगा नदीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या नदीला गंगा मैय्या असं संबोधलं जातं. राजा भागीरथानं तपस्या केल्याने देवी गंगा प्रसन्न होऊन स्वर्गातून पृथ्वीवर अवतारित झाली होती. या नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होते असा समज आहे.
Gangajal Todga: हिंदू धर्मात गंगा ही सर्वात पवित्र नदी (Ganga River) आहे. गंगा नदीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या नदीला गंगा मैय्या असं संबोधलं जातं. राजा भागीरथानं तपस्या केल्याने देवी गंगा प्रसन्न होऊन स्वर्गातून पृथ्वीवर अवतारित झाली होती. या नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होते असा समज आहे. पौराणिक धर्मग्रंथातही गंगेचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. देवी-देवतांनी या नदीत स्नान केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अधिकांश घरांमध्ये गंगाजल असतंच असतं. धार्मिक कार्यात गंगाजल वापरलं जातं. ज्योतिषशास्त्रात गंगाजलाचे अनेक उपाय आणि तोडगे सांगण्यात आले आहेत. या उपायांनी अनेक समस्या सुटू शकतात, असं सांगितलं जातं. असेच काही उपाय आणि तोडगे आपण पाहूयात...
नोकरी (Job)- गंगाजलाच्या उपायाने नोकरीतील अडचणी दूर होतात. बेरोजगारी दूर करण्यासाठी उपाय देण्यात आला आहे. पितळेच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात 11 थेंब गंगाजल टाकावं. गंगाजल मिश्रित पाणी सलग 40 दिवस 5 बेलपत्रांसह शिवलिंगावर अर्पण करावं. यामुळे नोकरी मिळण्यास मदत होते.
विवाह (Marriage)- लग्न जमत नसल्याने काही घरांमध्ये चिंतेचं वातावरण असतं. असं असल्यास कुमारीकेच्या स्नान करण्याच्या पाण्यात गंगाजल आणि थोडी हळद टाकावी. हा उपाय सलग 21 दिवस करावा. यामुळे विवाह जमण्यास येणाऱ्या अडचणी दूर होतील. तसेच योग्य वर मिळण्यास मदत होईल.
कर्ज (Loan)- डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल तर पितळेच्या तांब्यात गंगाजल भरून घरातील ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेस ठेवावा. या तांब्यांचं तोंड लाल कपड्याने झाकावं. हळूहळू डोक्यावरील कर्ज कमी होते.
बातमी वाचा- Rahu Gochar: नववर्ष 2023 राहु करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ
नकारात्मकता (Negativity)- गंगाजल चमत्कारिक आहे. गंगाजल घरात ठेवल्याने निगेटिव्हिटी दूर होते. रोज शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्यास शिव प्रसन्न होतात. तसेच अडकलेली कामं मार्गस्थ होतात.
धर्मशास्त्रानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला गंगा शंकराच्या जटांमधून पृथ्वीवर अवतरली होती. 2023 या वर्षात गंगा सप्तमी 26 एप्रिलला असणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)