June Grah Gochar 2024: वैदिक पंचागांनुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी आगामी जून महिन्यात 6 ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. ज्यामध्ये सर्व प्रथम 1 जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मेष राशीत गोचर करणार आहे. यानंतर युरेनस वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. याशिवाय 12 जून रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसंच ग्रहांचा राजकुमार बुध 14 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 29 जून रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर दर महिन्याला राशी बदलणारे सूर्य देव 15 जून रोजी मिथून राशीमध्ये गोचर करणार आहे. तसंच 29 जून रोजी शनी ग्रह त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये वक्री होणार आहेत. या 6 ग्रहांच्या स्थिती बदलामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे आणि चांगले बदल होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळणार आहे. 


मेष रास (Aries Zodiac)


जूनमध्ये होणाऱ्या 6 ग्रहांच्या चालीतील बदल या राशीसाठी सिद्ध होऊ शकतात. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुमची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरची व्याप्ती वाढवण्यात यश मिळेल आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक उत्कृष्ट संधीही मिळतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल.


वृषभ रास (Taurus Zodiac)


6 ग्रहांच्या हालचालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात कुटुंबात धार्मिक तसंच शुभ कार्य करू शकता. या महिन्यात तुम्ही वाहन खरेदी करू शकता. नोकरदार लोकांचे करियर मजबूत होणार आहे. विद्यार्थ्यांना यावेळी कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांना या काळात चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मित्र आणि बॉस यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.


सिंह रास (Leo Zodiac)


सिंह राशीच्या लोकांसाठी सहा ग्रहांचे राशी बदल अनुकूल ठरू शकतात. या काळात तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. कमाईचे नवीन मार्गही उपलब्ध होतील. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. लव्ह लाईफच्या बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तेथे निर्माण होतील. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)