Shani Shatabhisha Nakshatra: अवघ्या काही तासांत शनी करणार नक्षत्र गोचर; `या` राशींना मिळणार अपार पैसा
Shani In Shatabhisha Nakshatra: 24 नोव्हेंबरला शनी देवाने शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र 24 वे आहे.
Shani In Shatabhisha Nakshatra: ज्योतिष शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत विराजमान आहेत. यासोबतच 24 नोव्हेंबरला शनी देवाने शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र 24 वे आहे.
या नक्षत्राची राशी कुंभ आणि स्वामी राहु आहे. अशा स्थितीत राहु शनिदेवाच्या सोबत कुंभ राशीत राज्य करतो. अशा स्थितीत शनिदेव शतभिषा नक्षत्रात गेल्यास काही राशी अपार यशासह आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र गोचरमुळे फायदा होणार आहे, ते पाहुया.
कधी आहे शनीचं नक्षत्र गोचर?
ज्योतिषीय गणनेनुसार, शनी देव 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:04 वाजता शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनीदेव या नक्षत्रामध्ये 6 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3.55 वाजेपर्यंत राहणार आहेत.
मेष रास (Mesh Zodiac)
शनि शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार असून 11व्या भावात राहणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी ते अनुकूल राहणार आहे. या राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचे मित्र अधिक मदत करतील. तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. शनीच्या कृपेने तुम्ही अध्यात्माकडे वाटचाल करू शकाल. मोठ्या आर्थिक नफ्यासह बँक शिल्लक वाढणार आहे.
वृषभ रास (Vrishabha Zodiac)
शनीच्या नक्षत्र गोचरमुळे तुमच्या मेहनतीला भरपूर यश मिळणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. परदेशी प्रवास करणे फायदेशीर ठरेल. परदेशात व्यवसाय केल्यास मोठा नफा मिळू शकतो. सहकाऱ्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. हळूहळू पण प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
सिंह रास (Leo Zodiac)
शनी गोचरमुळे व्यावसायिक जीवनात ते खूप छान होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी अफाट यशासह बढती मिळू शकते. शनी तुमची नाती मजबूत करण्यास मदत करणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले होणार आहे. व्यवसायातही तुम्हाला मोठे यश मिळू शकते. करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलल्यास तुमच्या कामाचे कौतुक होईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )