Shani Vakri: जून महिन्यात शनी देव होणार वक्री; `या` राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता
Shani Dev Vakri In Kumbh: शनीच्या वक्री स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी काही राशींच्या संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते.
Shani Dev Vakri In Kumbh: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह शनी आहे. शनिदेवाने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला असून 30 जून रोजी ते वक्री होणार आहेत. शनिदेव त्याच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत वक्री होणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहेत.
शनीच्या वक्री स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी काही राशींच्या संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
वृष रास (Taurus Zodiac)
शनिदेवाची प्रतिगामी गती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना यावेळी बढती मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असाल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. व्यावसायिकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ होईल.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची प्रतिगामी गती अनुकूल ठरू शकते. तुमच्या ज्या काही योजना अडकल्या होत्या त्या हळूहळू पूर्ण होऊ लागतील. वैवाहिक जीवन देखील यावेळी आनंदी असणार आहे. तुमचा आर्थिक फायदा प्रचंड होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. भागीदारीच्या कामातून तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मकर रास (Makar Zodiac)
शनिदेवाची प्रतिगामी गती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने तुमच्या पगारात चांगली वाढ होईल. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमची लोकप्रियता वाढेल. प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )