Jaya Ekadashi 2023, Upay According to Zodiac Sign : आज जया एकादशी...माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी ही जया एकादशी अतिशय शुभ मानली जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाला एकादीचा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक एकादशीचं विशेष महत्त्वं आहे. शास्त्रात असं सांगण्यात आलं आहे की, आजच्या दिवशी मनोभावे पूजा आणि उपवास केल्यास भगवान विष्णूचा आशिर्वाद प्राप्त होतो. शिवाय आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.  जया एकादशीसाठी ज्योतिष शास्त्रानेही राशीनुसार काही उपाय सांगितले आहेत. तुमच्या राशीनुसार हे उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.   (jaya ekadashi 2023 shubh muhurat shubh yog pujan vidhi upay and mantra according zodiac signs marathi news)


जया एकादशीचा शुभ मुहूर्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया एकादशी 31 जानेवारी 2023 ला म्हणजे काल रात्री 11.53 वाजता सुरु झाली आहे. तर आज 1 फेब्रुवारी 2023 ला दुपारी 2.01 वाजता समाप्त होईल. यासोबतच 02 फेब्रुवारी रोजी सकाळी 07.10 ते मध्यरात्री 03.23 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील. त्यामुळे आजचा दिवस हा खूप शुभ आहे. 


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांनी सुख आणि सौभाग्य मिळविण्यासाठी जया एकादशीला भगवान विष्णूला सिंदूर अर्पण करावं.  'ओम गोविंदाय नमः' आणि 'ओम वामनाय नमः' चा 11-11 वेळा जप करावा.


वृषभ (Taurus)


जया एकादशीला धनप्राप्तीसाठी वृषभ राशीच्या लोकांनी देवाला कमळाची भांडी अर्पण करावीत तसंच भगवान विष्णूच्या त्रिविक्रम आणि मधुसूदन रूपांचं स्मरण करावं.


मिथुन (Gemini)


मिथुन  राशीच्या लोकांनी जया एकादशीला आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूला तुळशीची दोन पाने अर्पण करावीत. 'ओम मध्यवाय नमः' आणि 'ओम नारायणाय नमः' मंत्रांचा एकदा जप करावा.


कर्क (Cancer)


जया एकादशीला कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या राशींच्या लोकांनी भगवान विष्णूंना दही-साखर अर्पण करावं. याशिवाय भगवान केशव आणि श्रीधर स्वरूपाचं स्मरण करावं.


सिंह (Leo)


प्रेमात यश मिळवण्यासाठी आजच्या दिवशी भगवान दामोदरला रोळी-तांदूळ तिलक लावा. शिवाय प्रत्येकी पाच वेळा ' ओम पद्मनाभय नमः' आणि 'ओम हृषिकेशाय नमः' चा जप करावा. 


कन्या (Virgo)


जया एकादशीला कन्या राशीच्या लोकांनी उत्तम आरोग्यासाठी भगवान विष्णूला हिरव्या मूगाची डाळ अर्पण करावी. भगवान विष्णूच्या गोविंद आणि माधव रूपांचं स्मरण करावं. 


तुळ (Libra)


सुखी वैवाहिक जीवनासाठी आजच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी भगवान दामोदरला अबीर अर्पण करावा. "ओम त्रिविकर्माय नमः " आणि "ओम मधुसूदनाय नमः" असं दोन वेळा जप करावं. 


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी आपल्या रक्षणासाठी भगवान दामोदरला लाल चंदन अर्पण करावं. भगवान विष्णूच्या वामन आणि नारायण रूपांचं स्मरण करावं.


धनु (Sagittarius)


सौभाग्य प्राप्तीसाठी धनु राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला हळदीच्या दोन गुंठ्या अर्पण कराव्यात. 'ओम केशवाय नमः' आणि ' ओम श्रीधराय नमः' या मंत्राचा सात-सात वेळा जप करा.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी आपल्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी भगवान विष्णूला 5 निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. भगवान विष्णूचे पद्मनाभ आणि केशव स्वरूपाचं स्मरण करावं.


कुंभ (Aquarius)


प्रत्येक कार्यात लाभ आणि यशासाठी आजच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी घरामध्ये धूप जाळा.   'ओम हृषिकेशाय नमः' आणि 'ओम श्रीधराय नमः' या मंत्रांचा एकदा जप करावा.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी भगवान दामोदरला 11 पिवळी फुले अर्पण करावी. शिवाय सकारात्मकता वाढवण्यासाठी भगवान विष्णूचे गोविंद आणि माधव स्वरूप यांचं स्मरण करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)