मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरलेल्या वेळेवर राशी वक्री करतो. जेव्हा हे ग्रह वक्री करतात तेव्हाच त्यांचा प्रभाव मानवी जीवनावर होऊ लागतो. यावेळी 12 वर्षानंतर बृहस्पती म्हणजेच गुरु आपल्या स्वराशीत मीन मध्ये वक्री झाले आहेत. दिवाळीनंतर या योग येणार आहे. 24 नोव्हेंबरला गुरु इथून मार्गी होणार आहे. गुरूच्या मार्गक्रमणानं अत्यंत लाभदायक असा राजयोग तयार होत आहे. यामुळे सर्व राशींवर कमी अधिक फरकाने प्रभाव दिसून येणार आहे. दरम्यान, अशा तीन राशी आहेत ज्यांना राजयोगामुळे धनलाभ व करिअरमध्ये यशस्वी होण्याची संधी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया तुमची राशी आहे का यात...


आणखी वाचा : ...म्हणून सुष्मिता सेनला बॉलिवूडमध्ये मिळत नव्हत्या हव्या त्या भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - हा राजयोग वृषभ राशीसाठी परिणामकारक ठरू शकतो. याकाळात या राशीच्या लोकांना नोकरीत प्रगतीची मोठी संधी आहे. कमाईचे अन्य स्रोतही उपलब्ध होऊ शकतात. जर आपण कुठल्या व्यवसायाशी जोडलेले असू तर त्यातही लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुमचं कोणतं काम अडलेलं असेल तर ते मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असल्याने तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही. याशिवाय तुमचा फिरायला जाण्याचा योग आहे. कुटुंबासोबत वेळ व्यथित करण्यास मोकळा वेळ मिळेल. 


आणखी वाचा : ती जाम खोटारडी आहे; श्वेता आणि जया बच्चन यांनी कोणावर केला हा आरोप


मिथुन- हा राजयोग मिथुन राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. नोकरीच्या दृष्टिकोनातून मोठे बदल आणि फायदे होण्याची संधी तुम्हाला लाभू शकते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. व्यवसायात व्याप कमी नफा जास्त अशी फायद्याची डील मिळू शकते पण आपण त्यासाठी स्मार्ट काम करण्याची गरज असेल.


आणखी वाचा : अभिनेत्री दिशा पटानीचे वडील करणार राजकारणात प्रवेश, म्हणाले...


कर्क - कर्क राशीतील स्त्रियांसाठी अधिक भाग्यशाली ठरू शकतो. तुमचे नशीब उजळून टाकणारा हा योग असू शकतो त्यामुळे या काळात तुम्ही कुठल्याच कामात हार मानू नका. तुमच्या भाग्यात परदेशवारीचे योग आहेत तसेच लग्नासाठी इच्छुक तरुण तरुणींना मनासारखा जोडीदार लाभू शकतो.


आणखी वाचा : करण जोहरबाबत शाहरुख खानचं मोठ वक्तव्य; 'होय, आम्ही एकत्र...'


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)