Kartik Amavasya 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या अतिशय महत्त्व आहे. या वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवस असताना या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे जाणून घ्या. नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी अमावस्येला तिथीला पितरांना प्रसन्न करण्याची संधी सोडू नका. अमावस्येला पितृपूजन, स्नान, पिंडदानाला महत्त्व आहे. अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. अगदी पितृदोषापासून मुक्तीसाठी अमावस्येला महत्त्व आहे. (kartik amavasya 2023 when is the last moon of the year Bhaumvati Amavasya Dont miss the chance to do Pitru Pooja for happiness and prosperity in the New Year)


2023 मधील शेवटची अमावस्या कधी आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार कार्तिक अमावस्या 12 डिसेंबरला सकाळी 6.24 वाजेपासून 13 डिसेंबरला पहाटे 5.01 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू शास्त्रानुसार जी अमावस्या मंगळवारी (Bhaumvati Amavasya 2023) येते तिला भाऊमवती अमावस्या असं म्हणतात. 


शुभ वेळ - सकाळी 5:14 ते 6:43 पर्यंत
शुभ मुहूर्त - दुपारी 11:54 ते 12:35 पर्यंत
मुहूर्त - सकाळी 11.54 ते दुपारी 12.35 पर्यंत


कार्तिक अमावस्येचे महत्त्व


पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्याला महत्त्व आहे. कार्तिक अमावस्येला पितरांना तर्पण अर्पण करण्याची परंपरा आजही पाळली जाते. या दिवशी केलेल्या पूजेने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या दिवशी तर्पण आणि पिंडदान देण्याचे विशेष महत्त्व देखील आहे. या अमावस्येचे व्रत केल्याने प्रत्येक समस्या संपुष्टात येऊन जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. पौराणिक शास्त्रानुसार या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो.


हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?


सत्यनारायण पूजा


कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांची शांती आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी व्रत करण्यात येते. या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे अतिशय शुभ मानलं जातं. पूजेच्या ठिकाणी भगवान सत्यनारायण आणि देवी लक्ष्मी यांचं चित्र ठेवून रीतिरिवाजाने पूजा केल्यास पुण्य लाभतो. यानंतर गोड नैवेद्य अर्पण नक्की करा. भगवान सत्यनारायणाची कथा वाचून पूजा संपन्न करा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)