Shadashtak Yog: केतू-गुरुने तयार केला `षडाष्टक` योग; `या` राशींनी थोडं सावध राहण्याची गरज
Shadashtak Yog: केतूपासून आठव्या भावात गुरु आणि केतू गुरूपासून काही अंतरावर सहाव्या घरात स्थित आहे. अशा स्थितीत केतू आणि गुरु यांच्यामध्ये `षडाष्टक` नावाचा अशुभ योग तयार होणार आहे.
Shadashtak Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी मायावी ग्रह केतू ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. ते एका राशीत सुमारे 16 महिने राहतात. अशा परिस्थितीत, पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी सुमारे 18 वर्षे लागतात. गेल्या वर्षी म्हणजेच 30 ऑक्टोबर 2023 रोजी केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता. या ठिकाणी तो 2025 पर्यंत राहणार आहे.
यावेळी केतूचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या संयोग होणार आहे. देवांचा गुरु सध्या मेष राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत केतूपासून आठव्या भावात गुरु आणि केतू गुरूपासून काही अंतरावर सहाव्या घरात स्थित आहे. अशा स्थितीत केतू आणि गुरु यांच्यामध्ये 'षडाष्टक' नावाचा अशुभ योग तयार होणार आहे.
1 मे रोजी गुरूचा वृषभ राशीत प्रवेश झाल्याने हा योग संपुष्टात येणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
मेष रास (Mesh Zodiac)
षडाष्टक योग तयार झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. या काळात आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणतेही जुने कर्ज फेडू शकणार नाही. तुम्ही कोर्ट केसेसमध्ये अडकून राहाल. केतूचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे. यासोबतच कुटुंबात काही ना काही कारणावरून मतभेद होऊ शकतात.
कर्क रास (Kark Zodiac)
षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी 1 मे पर्यंत सावध राहण्याची गरज आहे. भावंडांशी संबंध बिघडू शकतात. यासोबतच वाणीतील दोषांमुळेही नातेसंबंध बिघडले असतील. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. शत्रूंपासून थोडे सावध राहण्याची गरज आहे. नोकरदार लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे.
धनु रास (Dhanu Zodiac)
धनु राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग थोडा कठीण असू शकतो. या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. तुमच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सरकारी कामातही कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे येतील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)