हिंदू धर्मात वास्तूला विशेष महत्त्व आहे. वास्तूमध्ये घर बांधण्यापासून ते सर्व काही व्यवस्थित ठेवण्यापर्यंतचे नियम घालून दिलेले आहेत, ज्याचे पालन केल्यास माणसाच्या जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो. स्वयंपाकघराबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, ते लक्षात ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.स्वयंपाकघराबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, ते लक्षात ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. यासोबतच यशातील अडथळे दूर होतात आणि माणसाच्या आयुष्यात आनंद येतो आणि देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते. चला जाणून घेऊया  स्वयंपाकघरासंबंधीत वास्तु नियम.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकघरात या चुका करू नका


1. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जिन्याच्या खाली स्वयंपाकघर कधीही बांधू नका. यासोबतच बाथरूमच्या वर किंवा खाली स्वयंपाकघर बांधणं देखील अशुभ  मानलं जातं.यामुळे  कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम  होऊ शकतो. 


2. वास्तूनुसार दक्षिण आणि पश्चिम दिशेने स्वयंपाक करणं अशुभ मानलं जातं.  यामुळे  आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय घरात नेहमीच गरिबी  राहते.


3.  ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असते ,  तिथे नकारात्मकता पसरते, ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींसोबतच आजारांनाही सामोरं जावं लागतं. स्वयंपाकघरातील धुळीमुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया देखील होतात.


4. वास्तुशास्त्रानुसा घराच्या मुख्य दरवाजातून गॅसची शेगडी नजरेस पडणं अशुभ आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 


5.  स्वयंपाकघरात झाडू कधीही ठेवू नका. असं केल्यानं घरात नकारात्मक ऊर्जा राहते. याशिवाय जर तुम्ही किचन सिंकखाली डस्टबिन ठेवल्याने सुद्धा  घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)