मंदिरात गेल्यावर तुम्ही प्रदक्षिणा घालता! कोणत्या देवासाठी किती परिक्रमा, जाणून घ्या
Parikrama Rules: मंदिरात गेल्यावर आपल्याला अनेक जण प्रदक्षिणा घालताना दिसतात. प्रदक्षिणा देवाच्या उपासनेतील एक भाग आहे. त्यांची कृती पाहून आपणही तसंच करतो. काही जणांना त्यामागचं कारण माहिती असतं. तर काही जण त्यांनी प्रदक्षिणा मारली म्हणून आपण मारावी या श्रद्धेनं फेऱ्या मारतात.
Parikrama Rules: मंदिरात गेल्यावर आपल्याला अनेक जण प्रदक्षिणा घालताना दिसतात. प्रदक्षिणा (Pradakshina) देवाच्या उपासनेतील एक भाग आहे. त्यांची कृती पाहून आपणही तसंच करतो. काही जणांना त्यामागचं कारण माहिती असतं. तर काही जण त्यांनी प्रदक्षिणा मारली म्हणून आपण मारावी या श्रद्धेनं फेऱ्या मारतात. मूर्ती (God), गाभारा किंवा मंदिराभोवती गोलाकार मारलेल्या फेरीला प्रदक्षिणा बोललं जातं. हिंदू धर्मात (Hindu Dharma) गर्भगृह, अग्नि, वृक्ष यासह नदी आणि पर्वताभोवतीही प्रदक्षिणा मारली जाते. प्रत्येक धर्मात प्रदक्षिणाला महत्त्व आहे. त्यामुळे याचं महत्त्व अधोरेखित होतं.कोणत्या देवासाठी किती प्रदक्षिणा माराव्या याबाबत माहिती आहे का? चला तर याबाबत जाणून घेऊयात
या पद्धतीने करा प्रदक्षिणा
प्रदक्षिणा कायम देवासमोर उभं राहिल्यानंतर डावीकडून उजवीकडे मारली पाहीजे. अगदी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फेरी मारली पाहीजे. प्रदक्षिणेमुळे मूर्ती आणि आसपास असलेली ऊर्जा प्राप्त होते. प्राण प्रतिष्ठापना झालेल्या मूर्तीतून कायम एक प्रकारची उर्जा निघत असते. धर्मग्रंथानुसार जे लोक अशा पवित्र स्थानी दंडवत प्रदक्षिणा करतात त्यांना दहा अश्वमेध यज्ञाएवढे पुण्य मिळते.
- कोणत्याही देवी (Goddess) मंदिरात गेल्यावर एकदाच प्रदक्षिणा घालावी.
- सूर्यदेवाची (Suryadev) प्रदक्षिणा सात वेळा घालावी.
- गणपती (Ganpati) मंदिरात गेल्यावर तीन वेळा प्रदक्षिणा घालावी.
- भगवान विष्णूची प्रदक्षिणा चार वेळा घालावी. विष्णूजींची परिक्रमा करताना सहस्त्रनाम किंवा विष्णू नामाचा जप केल्याने पापांचे क्षालन होते.
Astrology 2023: येणारं वर्ष 'या' राशींसाठी ठरणार लकी, नोकरी आणि व्यवसायात होणार प्रगती
- भगवान शंकराना अर्धी प्रदक्षिणा करावी. भगवान शंकराच्या सोमसूत्राचे उल्लंघन करू नये असे शास्त्रात सांगितलं आहे. सोमसूत्र म्हणजे शंकराला अर्पण करण्याचा प्रवाह जिथून वाहतो तेथून ओलांडू नये.
- गोवर्धन पर्वताची परिक्रमा अत्यंत शुभ मानली जाते.
- ज्या देवतांच्या प्रदक्षिणा पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही, अशा देवतांची प्रदक्षिणा तीनदा करावी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)