मेष - मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. विचार केलेली कामं पूर्ण होऊ शकतात.  दिवस कौटुंबिक, खासगी कामांत व्यतित होऊ शकतो. व्यवहारात सफलता मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामांची योजना आखू शकता. तुमच्या जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीची काळजी घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - नकारात्मक गोष्टीमध्ये अडकल्याने महत्त्वाची संधी हातून निसटण्याची शक्यता आहे. आज कोणताही निर्णय घेऊ नका. सावध राहा. विचार करुनच बोला. दुसऱ्यांच्या बोलण्याकडेही लक्ष द्या. जोडीदारासोबत वाहन चालवताना काळजी घ्या. तब्येत ठिक राहील.


मिथुन - नवीन काम हाती मिळू शकते. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन ऑफर मिळू शकते. विचार करत असलेली कामं करण्यास सुरुवात करा, काम पूर्ण होऊ शकते. दररोजची कामं पूर्ण होतील. पुढे जाल. महत्त्वपूर्ण मिटिंग, कामासाठी दिवस चांगला आहे. समस्या सुटतील.


कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत बेजबाबदारपणा करु नका. ऑफिसमध्ये घाई करु नका. विचार केलेली कामं पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. मेहनत अधिक घ्यावी लागू शकते. तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका.


सिंह - आज विचार केलेली कामं पूर्ण होणार नाहीत. अनेक विचार मनात येतील. पैसे सांभाळून ठेवा. देवाण-घेवाण आणि गुंतवणुकीच्या बाबतीत विचार करा. कटू बोलू नका. आज कोणतीही योजना आखू नका. सांभाळून राहा. कामात मन न लागल्याने समस्या वाढू शकतात. तब्येतीच्या बाबतीत दिवस चांगला आहे.


कन्या - व्यवसायात नवीन योजनांवर काम करु शकता. जोडीदाराची साथ मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. विचार करत असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. महत्त्वपूर्ण व्यक्तींशी भेट होऊ शकते. कामाकडे लक्ष द्या. तब्येत चांगली राहील. उत्साही राहाल.


तुळ - तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेत कामं पूर्ण करु शकता. कामात मन लागेल. अचानक चांगल्या संधी मिळू शकतात. अचानक मनात आलेले विचार फायद्याचे ठरु शकतात. जोडीदाराची साथ मिळेल. तब्येत चांगली राहील.


वृश्चिक - नोकरी, व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होण्याची शक्यता आहे. गोंधळ वाढू शकतो. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या होऊ शकतात. समस्या वाढवणारे लोक आजू-बाजूलाच असू शकतात. तब्येतीची काळजी घ्या.


धनु - आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. समजदारीने समस्या सोडवाल. दररोजच्या कामातून धनलाभ होऊ शकतो. मोठी समस्या संपू शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवीन लोकांशी भेट होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या.


मकर - सावध राहा. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्या समस्या वाढवू शकतात. मनात अनेक विचार असतील. जुन्या विचारांमध्ये राहाल. महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात. कामात मन लागणार नाही. व्यवसायात नवीन करार करु नका. 


कुंभ - ऑफिसमध्ये स्वत:ला नियंत्रणात ठेवा. योजना सफल होऊ शकतात. पुढील कामांसाठी योजना आखू शकता. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. 


मीन - व्यवसायात काही नवीन करण्याच्या नादात समस्या वाढू शकतात. मनात सतत सुरु असलेल्या विचारांमुळे कामात मन लागणार नाही. नोकरी, व्यवसायात घाई करु नका. एखादी गोष्ट पूर्ण न झाल्यास टेन्शन घेऊ नका. तब्येतीच्या बाबतीत दिवस चांगला नाही. जेवण वेळेत करा.