मेष - नोकरीत बढतीची शक्यता आहे. प्रपोज करण्यासाठी दिवस चांगला आहे. विचार करुनच मगच निर्णय घ्या. जुन्या समस्या डोकं वर काढू शकतात. ऑफिसमध्ये काही गोष्टी तुमच्यापासून लपवल्या जाऊ शकतात. गुंतवणुकीच्या योजना आखू शकता. कामं पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - विचार करुन गुंतवणूक करा. सावध राहा. कामात मन लागणार नाही. वायफळ खर्च होऊ शकतो. घाईमुळे कामं बिघडण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.


मिथुन - ऑफिसमध्ये  अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. जुने आजार पुन्हा जावणू शकतात. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. दररोजच्या कामात इतरांची मदत मिळणार नाही. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. समस्या वाढू शकतात.


कर्क - विचार केलेली कामं पूर्ण न झाल्याने मन लागणार नाही. धनहानीची शक्यता आहे. तणावपूर्ण दिवस आहे. काम करुनही तितकासा फायदा होणार नाही. हलगर्जीपणा करु नका. 


सिंह - कामात यश मिळेल. नोकरदार वर्गाला धनलाभाचा योग आहे. मेहनत अधिक घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. शुभ वार्ता मिळू शकते. 


कन्या - मेहनत घ्यावी लागेल. त्याचा फायदा होईल. जुन्या समस्या संपतील. नोकरीत दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. 


तुळ - विचार करुन गुंतवणूक करा. कामं टाळू नका. इतरांची मदत होऊ शकते. मन प्रसन्न राहील. करियरमध्ये प्रगतीसाठी प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. तब्येत चांगली राहील.


वृश्चिक - व्यवसायात टेन्शन वाढू शकते. सावध राहावे लागेल. तब्येतीबाबत हलगर्जीपणा करु नका. जुने आजार जाणवू शकतात. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करु नका.


धनु - व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधांसाठी वेळ चांगली आहे. जोडीदारासोबत वेळ जाईल. कौटुंबिक वातावरण चागंले राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात.


मकर - बेरोजगारांना नोकरीची संधी आहे. व्यवसायात लाभ होईल. महत्त्वाची कामं आज पूर्ण करा. ऑफिसमध्ये अधिकारी खुश राहतील. पती-पत्नीतील संबंध दृढ होतील. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.


कुंभ - नोकरीत बढतीची शक्यता आहे. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. आधी केलेल्या योजनांचा फायदा होऊ शकतो. नवीन लोकांच्या भेटी होतील. जोडीदाराची साथ मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. 


मीन - व्यवसायातील मोठे निर्णय सावधतेने घ्या. नुकसानाची शक्यता आहे. खास कामासाठी मनात गोंधळ राहील. खर्च वाढण्याची शक्यता आहे.