Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौर्णिमेला 4 राशींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा, तुमची रास आहे का? वाचा
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मांडातून अमृत वर्षाव होतो, असा समज आहे. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची (Devi Laxmi) पूजा केली जाते. त्याचबरोबर भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.
Kojagiri Pournima 2022: हिंदू पंचांगानुसार यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रविवारी सकारी 3 वाजून 41 मिनिटांनी सुरु होईल आणि 10 ऑक्टोबरला सकाळी 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत असेल. कोजागिरी पौर्णिमेला (Kojagiri Pournima) चंद्राची 16 कलांमध्ये छाया पडते. त्यामुळे चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली खीर ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून खाल्ली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मांडातून अमृत वर्षाव होतो, असा समज आहे. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची (Devi Laxmi) पूजा केली जाते. त्याचबरोबर भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. यावेळी ग्रहांची स्थिती पाहता चार राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे.
मेष (Mesh)- कोजागिरी पौर्णिमा मेष राशीसाठी फलदायी ठरणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल. अडकलेली कामं मार्गी लागतील. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
कन्या (Kanya)- या राशीवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. कुटुंबाकडून चांगलं सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. बॉस तुमच्या कामावर प्रचंड खूश असेल. या काळात जुन्या मित्रांना भेटण्याचा योग आहे.
तूळ (Tula)- ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची उलथापालथ होणार आहे. तूळ राशीत ग्रहांचा मेळा असणार आहे. असं असलं तरी कोजागिरी पौर्णिमा तूळ राशीसाठी चांगला दिवस आहे. या काळात अडकलेली कामं मार्गी लागतील. तसेच कार्यक्षेत्रात मोठं यश मिळेल.
Kojagiri Pournima 2022: कोजगिरी पौर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा
धनु (Dhanu)- या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा मिळेल. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जुनी गुंतवणूक फळेल आणि देवी लक्ष्मीची कृपा होईल. कर्जातून मुक्तता मिळू शकते.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामन्य मान्यता आणि माहितीच्या आधारे दिली आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)