Kotipati Rajyog Chandika Yog and Jaya Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला विशेष महत्त्व असतो. ग्रह हे एका ठराविक वेळेनंतर आपलं घर बदलतात. त्यामुळे कुंडलीत अनेक प्रकारचे योग तयार होत असताात. काही योग तर हे राजयोगापेक्षाही महत्त्वाचे असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्र आणि गुरु यांच्या संयोगामुळे तयार होणाऱ्या कोटीपती योगाबद्दल जाणून घेणार आहोत. कोटि या संस्कृत शब्दाचा अर्थ हा एक कोटी असा होतो. याचा अर्थ ज्याच्या कुंडलीत हा योग तयार होतो तो गडगंज श्रीमंत होतो. त्याशिवाय जया योग आणि चंडिका योग याबद्दलही आज आपण जाणून घेणार आहोत. (kotipati rajyog chandika yoga jaya yoga 7 zodiac will get benefits)


कोटीपती योग !


जेव्हा कुंडलीत शुक्र आणि गुरु मध्यभागी असतात. लग्न चार राशींमध्ये असतो आणि शनि मध्यभागी तेव्हा कोटीपती योग जुळून येतो. 


हा योग ज्या व्यक्तीच्या कुंडलीत तयार होतो त्याला करिअरमध्ये सर्वाधिक फायदा होतो. संपत्ती, किर्ती आणि भाग्य या व्यक्तीची साथ देतात.  हा एक दुर्मिळ योग असल्याने हा असाधारण लोकांच्या कुंडलीतच तयार होतो. ही व्यक्ती बुद्धिमान आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यास समक्ष होते. समाजात त्यांचा मान वाढतो. 


जया योग !


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा जया योग हा अतिशय उत्तरार्ध शुभ योग मानला जातो. कुंडलीतील सहाव्या घराचा स्वामी दुर्बल आणि दहाव्या घराचा स्वामी अत्यंत श्रेष्ठ असतो तेव्हा हा जया योग जुळून येतो. 


या योगामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आनंदच आनंद येतो. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला यश मिळतो. तुम्हाला कामात नशिबाची साथ मिळते. ही लोक दीर्घायुष्यी होतात आणि कायम निरोगी राहतात. 


चंडिका योग !


नवमशाच्या 6व्या घराचा स्वामी आणि  नवमशाचा स्वामी सूर्य यांची संयोग होतो तेव्हा चंडिका योग तयार होतो. या योगामुळे ही व्यक्ती दानधर्माला अतिशय प्राधान्य देतात. खूप दानशूर असतात ही व्यक्ती. या व्यक्तीच्या आयुष्यात ते जेवढा विचार करतात त्यापेक्षा अधिक कमवतात. अगदी त्यांचा घराची तिजोरीही पैसे ठेवण्यासाठी कमी पडले, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास सांगतात. लोक सदैव आनंदी जीवन जगतात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)