Janmashtami 2023 : 6 की 7 सप्टेंबर, नक्की केव्हा साजरी होईल जन्माष्टमी? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व
Janmashtami 2023 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी करण्यात येते. मात्र यंदा 6 की 7 सप्टेंबर नेमकी कधी साजरी करायची याबद्दल संभ्रम आहे.
Janmashtami 2023 : हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीला अतिशय महत्त्व आहे. श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता. कुठे कृष्णाष्टमी तर कुठे गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जाणारा हा उत्सव यंदा नेमका कधी साजरा करायचा आहे, याबद्दल संभ्रम आहे. (Shree Krishna Janmashtami 2023)
अशी मान्यता आहे की, यंदा श्रीकृष्णाची 5251 वी जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्र आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, यंदा जन्माष्टमी दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यावर्षी जन्माष्टमीचा सण बुधवारी 6 सप्टेंबर 2023 ला ( (Janmashtami 2023 Date)) साजरा करण्यात येणार आहे. चंद्राचे आवडते नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र ((Janmashtami 2023 Rohini Nakshatra)) हे सकाळी 9:20 पासून सुरु होणार असून 7 सप्टेंबरला सकाळी 10.25 वाजेपर्यंत असेल. तर पंचांगानुसार अष्टमी तिथी ही 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबरला (janmashtami holiday) दुपारी 4:14 वाजेपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्र पिंपळकर म्हणतात गृहस्थ 6 सप्टेंबरला जन्माष्टमी आणि 7 सप्टेंबरला वैष्णव संप्रदायात कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करणार आहेत. (Krishna Janmashtami 2023 Date 6 or 7 september in rohini nakshatra Time Shubh Muhurat janmashtami holiday and Dahi Handi 2023 Date)
जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त (Janmashtami 2023 Shubh Muhurat)
6 सप्टेंबर 2023 - रात्री 12.02 ते 12.48 वाजेपर्यंत असणार आहे.
पूजा मुहूर्त (Janmashtami 2023 Puja Muhurat)
श्री कृष्ण पूजेची वेळ - 6 सप्टेंबर 2023, रात्री 12.00 ते 12:48 वाजेपर्यंत
पूजेचा कालावधी – 48 मिनिटं
जन्माष्टमीला अशी करा पूजा (Janmashtami 2023 Puja Vidhi)
सप्तमीच्या दिवशी फक्त हलके आणि सात्विक अन्न ग्रहण करावे. व्रताच्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर 2023 सकाळी स्नान करून सर्व देवतांची आराधना करावी. त्यानंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड बसा. आता हातात पाणी, फळं, फुलं घेऊन उपवासाचं व्रत करा. भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकी यांची मूर्ती किंवा सुंदर चित्र स्थापन करा. देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी यांची नावं घेऊन पूजा करा. मध्यरात्री 12 नंतरच हे व्रत पाळलं जातं. या व्रतामध्ये धान्य वापरले जात नाही.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )