Lakshmi Upay : आयुष्य जगायला प्रेमासोबतच पैसेही लागतात. सर्वसामान्यांना जगण्यासाठी रोज रक्ताचं पाणी करावं लागतं. दिवसेंदिवस वाढणारी महागाई त्यामुळे सर्वसामान्यांचा घाम फुटतो. आज देशासाठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज देशासोबत आपल्या वर्षभराचे बजेट (Budget 2023) ठरणार आहे. काय स्वस्त होणार काय महागणार याकडे सर्वसामान्यांचा नजरा लागल्या आहेत. प्रत्येका वाटतं आपलं नशीब पलटावं आणि आपण आपल्या घरावर पैशांचा पाऊस पडावा. पण सतत पैशांची चणचण...तरी कधी पैसा येऊन पण तो राहत नाही. अशावेळी ज्योतिषशास्त्रात (Astrology Upay) काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास तुमच्या घरातील तिजोरीत कायम लक्ष्मी मातेचा वास राहिल. तुम्हाला कधीही पैशांची अडचण जाणवणार नाही. (Laxmi Mata Upay and hanuman upay for money dhan labh upay remedy Astrology tips marathi news)


'हे' उपाय करा आणि लक्ष्मीची आशिवार्द मिळवा


लक्ष्मीमातेला हे फुल अर्पण करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज सकाळी आंघोळ करुन लक्ष्मी मातेची पूजा करा आणि लाल फुलं अर्पण करा. याशिवाय दुधापासून बनवलेली मिठाईचा नैवेद्य दाखवा. हा उपाय केल्याने चमत्कारिक परिणाम तुमच्या घरात दिसून येणार. 


हनुमानजींची पूजा करा!


मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजी मंदिरात हा उपाय केल्यास तुम्हाला धनलाभ होतो. पिंपळाचं ताजं आणि न तुटलेले पान घ्या त्यावर चंदन किंवा रोळीने राम लिहा आणि ते हनुमानजीला अर्पण करा. याशिवाय मिठाईचं नैवेद्य दाखवा. 


घरात करा हा उपाय!


दर शुक्रवारच्या दिवशी संध्याकाली महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा तुळशीसमोर गाईच्या दुधापासून बनवलेला तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्यास तुमच्या घरावरील आर्थिक संकट दूर होईल आणि तुमच्यावर लक्ष्मीमातेची कृपा राहील. 


'हा' उपाय केल्यास चमत्कारिक परिणाम 


दिवाळीत झाडू घेण्याची प्रथा आहे. या झाडूचा उपाय केल्यास तुम्हाला चमत्कारिक परिणाम दिसून येतील.  धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता मानल्या जाणाऱ्या धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी झाडू खरेदी करून दिवाळीच्या दिवशी पूजेपूर्वी थोडी साफसफाई करावी, असं केल्याने दारिद्र्य दूर होईल आणि कुबेर सोबत माँ लक्ष्मी येईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)