Lemon Remedies For Money: तुम्ही जर आर्थिक समस्येपासून त्रस्त असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्योतिष शास्त्रात (Astrology) आर्थिक समस्येवर (Financial problems) मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. तुमची कुंडली पाहून तुम्हाला या समस्येबद्दल ज्योतिष शास्त्रात उपाय सांगितले जातात. पण साधारणपणे सगळ्यांचा किचनमध्ये मिळणारी एक गोष्ट तुम्हाला मालामाल करु शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे स्वयंपाकघरातील (kitchen) लिंबू (Lemon). हे केवळ आपल्या जेवणाची चवच वाढवत नाही तर आपल्या जीवनासाठी अनेक शुभ परिणाम देखील देते. तुम्ही लिंबाचा वापर जेवणासोबत साफसफाईमध्ये करू शकता आणि ज्योतिष शास्त्रानुसार लिंबूने अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार लिंबाशी संबंधित नियम आणि उपायांचे योग्य प्रकारे पालन केल्यास तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळू शकते.


ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ डॉ. आरती दहिया (Dr. Aarti Dahiya) यांनी लिंबाच्या काही उपायांबद्दल सांगितलं आहे. चला आपण ते जाणून घेऊयात...


धनलाभसाठी करा हा उपाय


जर तुमच्या घरात वारंवार धनहानी होत असेल आणि तुम्हाला त्याचे कारण देखील कळत नसेल तर एक लिंबू घेऊन घराच्या चारही कोपऱ्यात 7 वेळा फिरवा आणि एखाद्या निर्जन ठिकाणी न्या हे चारही तुकडे चारही दिशांना फेकून द्या.


थांबलेले काम होणार पूर्ण


एक लिंबू घ्या आणि सात वेळा डोक्यावर फिरवा आणि त्याचे दोन तुकडे करा. डाव्या हाताचा तुकडा उजवीकडे आणि उजव्या हाताचा तुकडा डावीकडे फेकून द्या. एका लिंबावर चार पाकळ्या टाकून ओम श्री हनुमंते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने तुमचे थांबलेले काम पूर्ण होईल.


निरोगी राहण्यासाठी करा हे उपाय


शनिवारी, एक लिंबू घ्या आणि रुग्णाच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवा. त्याचे दोन तुकडे करून डोक्यापासून पायापर्यंत फिरवा. संध्याकाळी दोन्ही तुकडे दोन दिशेने फेकून द्या. या उपायाने तुमच्या घरातील सर्व रोग दूर होतील, असं ज्योतिषीशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


आनंद आणि समृद्धीसाठी उपाय


घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी एक लिंबू घेऊन एका चौरस्त्यावर जा आणि लिंबू स्वत:वर सात वेळा फिरवून त्याचे दोन भाग करा. एक मागच्या बाजूला फेका आणि दुसरा पुढे फेकून द्या आणि न वळता पुढे जा. लिंबाच्या या उपायाने तुमच्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडतील. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की लिंबाची कोणतीही युक्ती करताना तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही, अन्यथा त्याचे उपाय फलदायी होणार नाहीत, असं ज्योतिषीशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


वाईट नजर दूर करण्यासाठी लिंबू युक्ती


वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू देखील खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी तुम्ही घरासमोर हिरव्या मिरच्यांसोबत लिंबू लटकवू शकता. लिंबाची आंबट चव आणि मिरचीची तिखट चव वाईट नजरेपासून दूर राहण्यास मदत करते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते.



(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामन्य मान्यता आणि माहितीच्या आधारे दिली आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)