Shani Uday: पुढच्या वर्षी शनी देवाचा होणार उदय; `या` राशींच्या व्यक्तींना धनवृद्धीसह लाभच लाभ!
Shani Uday: पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कुंभ राशीत राहून शनी आपली हालचालीत बदल करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनी अस्त होणार असून त्यानंतर मार्च 2024 मध्ये शनीचा उदय होणार आहे.
Shani Uday: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शनीचे गोचर किंवा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शनीच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे शून्यातून सर्वकाही बनू शकते. त्याचबरोबर शनीची स्थिती बिघडल्यास व्यक्तीला जीवनात दु:ख आणि वेदनांना सामोरे जावे लागू शकते.
पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कुंभ राशीत राहून शनी आपली हालचालीत बदल करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनी अस्त होणार असून त्यानंतर मार्च 2024 मध्ये शनीचा उदय होणार आहे. 18 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे. याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया शनीच्या उदयामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनीच्या उदयानंतर खूप फायदा होईल. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकतात. यावेळी घरात सुख-शांतीचे वातावरण राहणार आहे. मित्राच्या मदतीने जीवनातील अडचणी दूर होऊ लागतील. या काळात तुमच्या सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.
वृषभ रास
शनीची ही बदललेली चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणार आहे. या राशीच्या लोकांसाठी वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. सुख-शांतीचे वातावरण राहील. करिअरमध्ये पदोन्नती होण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला यावेळी चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.
धनु रास
धनु राशीच्या लोकांना पुढील वर्षी शनिची ग्रहस्थिती आल्यावर लाभ होऊ शकतो. तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्ही तुमच्या करिअरमधील सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आर्थिक समस्या हळूहळू संपतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )