मुंबई : तुम्ही शिवमंदिराच्या आत भोलेनाथाच्या दर्शनासाठी गेल्यावर, तेथे बाहेर नंदी बैल असल्याचे पाहिले असेल. तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात, तरी तुम्हाला शिवमंदिरात शिवाच्या मुर्तीसमोर नंदी बैलाची मूर्ती पाहायला मिळेल. तेथे भक्त आधी नंदीच्या मूर्तीचे दर्शन घेतात आणि मग भोलेनाथाच्या गाभाऱ्यात जातात. परंतु असे का असते असा कधी तुम्ही विचार केलाय?  नंदी हे भगवान शंकराचे वाहन आहे असे म्हटले जाते. परंतु शिव आणि नंदीचे नात्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक, भगवान शिवाचे वाहन हे नंदीच्या परिश्रमाचे प्रतीक आहे. यासोबतच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, नंदी नेहमी भगवान शंकराकडे तोंड करून बसलेला असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर त्यांची कारणे जाणून घेऊ या.


भगवान शिवाच्या मंदिरात नंदी का दिसतो?


जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा आपली नजर शिवलिंगासमोरील नंदीवर पडते. म्हणजेच भोलेनाथाच्या आधी भक्तांना नंदीचे दर्शन होते. तसेच बैलाच्या कानात नवस देखील बोलला जातो. त्यामागे एक रंजक किस्सा आहे.


नंदी भगवान शिवाचा प्रिय कसा बनला?


पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर पडलेल्या वस्तूंवरून भांडण झाले. अशा स्थितीत समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेले विष पिऊन शिवाने जगाचा उद्धार केला. यादरम्यान विषाचे काही थेंब जमिनीवर पडले होते. तेव्हा नंदीने हे थेंब आपल्या जिभेने चाटले. नंदीचे हे प्रेम आणि आसक्ती पाहून शिवाने नंदीला महान भक्त ही पदवी दिली. त्याचवेळी लोक शिवाला नतमस्तक होण्यासोबतच त्यांची पूजा करतील, असेही त्यांनी वरदान दिले. या कारणामुळेच आपल्याला शिवलिंगा मूर्तीसमोर नेहमी नंदी पाहायला मिळतो.


एवढेच नाही तर भगवान शिवाने नंदीला मंदिरात आपल्या समोर बसण्याचे वरदानही दिले. जिथे नंदी वास करील तिथे भगवान शिव वास करतील असेही सांगण्यात आले. यामुळेच प्रत्येक शिवमंदिरात नंदीची स्थापना केली जाते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)