Magical Remedies For Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमजोर असेल, तर व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतें. तर जेव्हा शनि बलवान असतो तेव्हा व्यक्तीचे दिवस पालटतात. शनिवारी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते, असं सांगितलं जातं. तसेच शनिवारी काही उपाय करून पाहिल्यास शनिदेवाची व्यक्तीवर प्रसन्न होतात. (magical remedies for shani dev blessings it is very miraculous a small remedy done on saturday)


गाईला तेल लावलेली पोळी भाकरी खायला द्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाधीशाचं स्थान आहे. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात. असं मानले जातं की ज्या व्यक्तीच्या जीवनात शनिदेव प्रतिकूल ठिकाणी असतात, त्यालाअनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र शनिदेवाच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर गायीला तेलातली पोळी खाऊ घातल्यास कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते, असं म्हटलं जातं.


शनिला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास करतात. पूजेसह विविध उपायही अवलंबतात, जेणेकरून शनीचा कोप टाळता येईल. यामुळे शनिची कृपा होते. तसेच शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर स्नानानंतर शनिची पूजा करावी. यामुळे व्यक्तीपासून दु:ख, कलह आणि अपयश दूर जातं. तसंच नशीब फळफळतं.


आणखी काही उपाय


ज्योतिष शास्त्रानुसार मोहरीच्या तेलात लोखंडाचा खिळा टाकून ते दान करा.सोबतच पिंपळाच्या मुळात अर्पण करा, असं केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात.


या दिवशी छाया दानाचेही विशेष महत्त्व आहे. पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात चेहरा पहा आणि नंतर ते शनि मंदिरात ठेवा.