Maha Daridra-Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात 2 अतिशय अशुभ योग! 6 राशींच्या आयुष्यावर सूर्यदेवाचा प्रकोप
Maha Daridra and Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात दोन अतिशय अशुभ योग तयार होत आहे. सूर्याचा स्थितीमुळे 6 राशींच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. करिअर आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना फटका बसणार आहे.
Maha Daridra and Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे. त्यामुळे काही शुभ योगासोबत राजयोग जुळून येतं आहे. तर काही राशींच्या संयोगातून अशुभ योगही निर्माण झाले आहे. अधिक मासात सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे महा दरिद्र योग तयार होणार आहे. तर दुसरीकडे खप्पर योगाचा परिणाम काही राशींच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे. (Maha Daridra Khappar Yoga formed due to sun surya gochar 6 zodiac signs money loss till 16 days astrolog)
महा दरिद्र आणि खप्पर योग कसा तयार होणार?
देवगुरु बृहस्पती सहाव्या ते बाराव्या भावात असतो तेव्हा दरिद्र योग तयार होतो.जेव्हा शुभ योग मध्यभागी असतो आणि अशुभ ग्रह धनाच्या घरात असतात तेव्हाही महा दरिद्र योग जाचकाच्या आयु्ष्यात संकटाचे वादळ आणतो.
शुक्र आणि शनीच्या प्रतिगामी गतीमुळे अधिकमासात खप्पर योग तयार होणार आहे. या योगाचा फटकामुळे पुढील 30 दिवस काही राशींना सतर्क राहावे लागणार आहे.
महा दरिद्र योगामुळे 3 राशींवर संकट
मिथुन (Gemini)
या योगामुळे यांना आरोग्याचा समस्या जाणवणार आहे. करिअरबाबतीत तुमची चिंता वाढणार आहे. सरकारी नोकरदारांसाठी कठीण काळ असेल. कुटुंबातील वातावरण खराब होईल. जोडीदारासोबत वाद होणार आहे.
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांना या योगामुळे आई आणि जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लाघणार आहे. कामात अतिशय दक्ष राहा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावे. छुपे रोग डोके वर काढणार आहे. व्यावसायिकांसाठी खराब काळ असेल.
धनु (Sagittarius)
या राशीच्या लोकांना या योगाचा फटका बसणार आहे. वडील आणि जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रस्ते अपघाताची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
खप्पर योगामुळे 'या' राशींनी 16 ऑगस्टपर्यंत राहावे सतर्क
हेसुद्धा वाचा - August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार
मीन (Pisces)
या राशींना खप्पर योगामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. न्यायालयीन प्रकरणात वेळ जाणार आहे. मन विचलित राहणार आहे. कोणाशीही तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलू नका. कष्ट करुनही कामातून यश मिळणार नाही.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांना खप्पर योगातून अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विरोधकांचा त्रास या दिवसांमध्ये होणार आहे. सरकारी नियमांचं पालन करा अन्यथा मोठ्या संकटात अडकू शकता. व्यवसायात कठीण स्पर्धेमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांना या योगाचा सर्वाधिक वाईट परिणाम दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रात तणाव वातावरण असेल. या काळात कुठलीही गुंतवणूक करु नका. जोडीदारासोबत वाद होणार आहे.
कर्क (Cancer)
या लोकांनी 16 ऑगस्टपर्यंत वागण्या-बोलण्यावर संयम बाळगा. या काळात कुठेही काही शेअर करु नका. कामाच्या ठिकाणी वाद विवाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात तणाव असणार आहे. आरोग्याचीही विशेष काळजी घ्या.
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांना करिअरमध्ये सतर्क राहावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. सहकारी तुमच्या विरोधात कटकारस्थान रचणार आहेत. पत्नी किंवा प्रेम जोडीदारासोबत दुरावण्याची शक्यता आहे. मालमत्तासंबंधित घटना वादाचं कारण बनू शकतं.