Mahalaxmi Yog :  आज शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत गुरु आणि शुक्र यांच्या गोचरने महालक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच  आज हनुमान जयंती साजरी होत आहे. अशावेळी हा महालक्ष्मी योग होत आहे. याचा फायदा काही राशींना होणार आहे. त्याचवेळी त्यांच्या हातात पैसाच पैसा येणार आहे. धनलाभ होणार असल्याने या राशींचा हा भाग्योदय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते.  हा दिवस गुरुवार असल्यामुळे हनुमानजींसोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेचेही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.  गुरुवारचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. याशिवाय या वर्षी शुक्र ग्रहही स्वतःच्या राशीत गोचर होत असून महालक्ष्मी योग तयार होत आहे. या दिवशी गुरु-शुक्र मिळून हा योग तयार होत आहे.  


हनुमान जयंतीला 'या' राशींचे भाग्य उजळणार


ज्योतिष शास्त्रानुसार महालक्ष्मी योग अत्यंत चांगला मानला जातो. हा योग मोठे सुख आणि समृद्धी देणारा मानला जातो. भाग्येश बलवान असताना आणि धनामुळे गुरु आणि शुक्र चांगल्या स्थितीत असतात. याशिवाय गुरु-शुक्र केंद्रस्थानी असल्यास आणि नवव्या घराचा स्वामीही केंद्रस्थानी असल्यास महालक्ष्मी योग तयार होतो.


हनुमान जयंतीच्या दिवशी बनलेला हा शुभ योग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकेल. मात्र, वृषभ, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ आणि चांगला परिणाम देणार असणार आहे. या लोकांच्या हातात पैसे खेळतील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि जीवनात सुख-समृद्धी वाढेल.


या लोकांवर मां लक्ष्मी कृपा करते


ज्या लोकांच्या कुंडलीत महालक्ष्मी योग तयार होतो, त्यांच्यावर माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. त्यांच्यावर आशीर्वाद असतो. एवढेच नाही तर त्यांना आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. तसेच, जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा कमी राहत नाही. या लोकांना जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि ऐशोआराम मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग तयार होतो, ते खूप भाग्यवान असतात. त्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट होते. 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)