Mahashivratri 2024 : शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे. 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्साह मंदिरं आणि घरोघरी असणार आहे. धार्मिक शास्त्रात महाशिवरात्री अतिशय पवित्र आणि अद्भूत शक्तीचा सण मानला जातो. यादिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवसाला धार्मिकसोबत वैज्ञानिक कारण आहे. महाशिवरात्रीची रात्र जागकरण करायचं असतं. त्यासोबत यादिवशी शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्याने शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष प्राप्त होतं अशी शिवभक्तांचा विश्वास आहे. (Mahashivratri 2024 How to worship Mahashivratri in four hours Do this Shastrashuddha Shiv Pujan vidhi and its benefits in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धार्मिक शास्त्रानुसार महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरमध्ये करतात. या चार प्रहरात पूजा केल्यामुळे धर्म, धन, काम आणि मोक्ष प्राप्त होतो. भगवान शंकराला दूध अर्पण करुन त्यांना पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करण्यात येतो. या वेळच्या पूजेमध्ये शिवमंत्राचा जप किंवा शिवाची स्तुती करणे विशेष फलदायी मानली जाते. Bhavesh Bhimanathani या महादेवाची आराधना करणारे आणि शिवभक्त यांनी यापूजेबद्दल सांगितलं आहे. 


चार प्रहरांतील पूजेची वेळ


रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ - 06:25 ते रात्री 09:28
रात्रीची दुसरी प्रहार पूजा वेळ - रात्री 9:28 ते 9 मार्चला रात्री 12:31
रात्री तृतीया प्रहार पूजा वेळ - 12:31 AM ते 3:34 AM
रात्री चतुर्थ प्रहार पूजा वेळ – पहाटे 03.34 ते 06:37 पर्यंत


कशी करायची चार प्रहरांतील पूजा?


महाशिवरात्रीतील प्रत्येक प्रहर हा तीन तासांचा आहे. पहिल्या प्रहर पूजेची वेळ संध्याकाळी 06:25 ते रात्री 09:28 वाजेपर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करावा. दुसरा प्रहर रात्री 9:28 ते 9 मार्चला रात्री 12:31 वाजेपर्यंत आहे. या दुसऱ्या प्रहरच्या वेळेत शिवलिंगावर दही आणि पाण्याने अभिषेक करावा. तिसरा प्रहर रात्री 12:31 ते 3:34 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये शिवलिंगावर तुपाने अभिषेक करुन पाणी अर्पण करावं. आता चौथ्या प्रहर आणि विशेष प्रहर जो ब्रह्म मुहूर्तावर असून पहाटे 03.34 ते 06:37 वाजेपर्यंत शिवलिंगावर मध आणि पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र आणि पांढरं फुल अर्पण करायला विसरु नका. 



त्यासोबतच "ओम नमः शिवाय" या मंत्राचा तीन वेळा माळ जप करा. सोबत "मृत्युंजय मंत्र" ची एक माळ जप देखील करा. या पूजेसह शिवाचं ध्यान नक्की करा. महाशिवरात्रीला चार प्रहारात पूजा केल्यास तुमचं आयुष्य बदलून जाईल. जेव्हा तुम्ही महादेवाला पूर्णपणे स्वत:ला समर्पित करता. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)