Mahashivratri Puja Importance in Marathi: वर्षभरात अनेक शिवरात्री येतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री असं म्हणतात. पण वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात अद्भूत आणि शक्तीशाली असते. पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री महादेव बरात घेऊन पार्वतीच्या घरी आपल्या कुटुंब गणप्रेतसोबत गेले होते. यावेळी पार्वतीच्या घरचे महादेवाचे रुप आणि गणप्रेतला पाहून घाबरले. (Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts say astrology in marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा माता पार्वती म्हणाल्या की तुमचं हे रुप मला स्विकार आहे, पण माझे घरचे लोक तुम्हाला घाबरत असल्याने तुम्ही दुसऱ्या रुपात या. त्यावेळी भगवान शंकराने आपल्या सगळ्या सुंदर रुपात प्रकट झाले. महादेवाच्या या रुपाला चंद्रशेखर म्हणून ओळखलं जातं. महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचं मिलन आहे. असं म्हणतात या दिवशी महादेव पृथ्वीवर येऊन तुमच्या शक्तीसोबत एकजीव व्हायला. 



महाशिवरात्रीचा दिवसासह रात्रीलाही विशेष महत्त्व आहे. या रात्री जागरण करुन विशेष पूजा करावी असं सांगितलं आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर त्याचे वैज्ञानिक महत्त्वही आहे. महाशिवरात्रीची रात्र इतकी खास का मानली जाते याबद्दल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ श्रद्धा कृष्ण कुमार हिने सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने महाशिवरात्रबदद्ल अनेक तथ्य सांगितले आहेत. 


काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? 


वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं झाल्यास, महाशिवरात्रीच्या रात्री उत्तर गोलार्धात अशा प्रकारे वसलेले असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या विश्वाच्या दिशेने वरच्या दिशेने जाते. जणू निसर्गच माणसाला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यास मदत करत आहे, असा अद्भूत अनुभव आपल्याला येतो. महाशिवरात्रीच्या रात्री, एखाद्या व्यक्तीने ध्यानाच्या मुद्रेत सरळ पाठीचा कणा ठेवून बसल्यास किंवा मंत्रांचा जप केल्यास त्या व्यक्तीला या नैसर्गिक स्थितीचा जास्तीत जास्त लाभ मिळतो. 



रात्रीच्या पूजेची विशेष वेळ


महाशिवरात्रीच्या रात्री विशेष पूजेला महत्त्व आहे. तुम्हालाही महाशिवरात्रीला विशेष पूजा करायची असेल, तर जाणून घ्या ज्योतिषी श्रद्धा कृष्ण कुमार हिच्याकडून 


रात्रीच्या पूजेच्या चार प्रहरांतील पूजेची वेळ


रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ - 06:25 ते रात्री 09:28
रात्रीची दुसरी प्रहार पूजा वेळ - 9 मार्च रोजी रात्री 9:28 ते रात्री 12:31
रात्री तृतीया प्रहार पूजा वेळ - 12:31 AM ते 3:34 AM
रात्री चतुर्थ प्रहार पूजा वेळ – पहाटे 03.34 ते 06:37 पर्यंत


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)