Mahashivratri 2024 :  हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री हा देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. शिवभक्तांसाठी हा दिवस जणू काही दसरा दिवाळीच...पौराणिक मान्यतेनुसार आणि शिवपुराणानुसार या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी शिवभक्त मोठ्या भक्तभावाने भोलेनाथाची पूजा करतात. असा हा शुभ दिवस नेमका कधी आहे जाणून घ्या. (Mahashivratri 2024 When is Mahashivratri March 8 or 9 Know List of Pooja Sahitya with Shubh Muhurat in marathi)


महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी  8 मार्चला रात्री 09.57 वाजेपासून  9 मार्चला संध्याकाळी 06.17 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला साजरी करायची आहे. त्याशिवाय प्रदोष काळात शिव पूजा केली जाते. 


महाशिवरात्री 2024 पूजेचा शुभ मुहूर्त


पहिल्या प्रहरातील पूजेची वेळ -  8 मार्चला सायंकाळी 6.25 ते रात्री 9.28 वाजेपर्यंत
दुसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ - 9 मार्चला रात्री 09.28 ते 12.31 वाजेपर्यंत 
तिसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ - 9 मार्चला मध्यरात्री 12.31 ते पहाटे 03.34 वाजेपर्यंत 
चतुर्थ प्रहार पूजेची वेळ - 9 मार्चला पहाटे 03.34 ते 06.37 वाजेपर्यंत 


महाशिवरात्री पूजा साहित्य यादी


5 किंवा 11 मातीचे दिवे
 पाण्यासह नारळ
 1 रक्षासूत्र
 पिवळी मोहरी,
अखंड अक्षत
कुशचे आसन
पंचमेवा
फळे
मिठाई
उसाचा रस
 वेलची
तीळ
जव
चंदन
रुद्राक्ष
कुमकुम
भस्म
 केशर
सिंदूळ
वात
तूप
साखर
दूध
दही
गंगाजल
मध
गूळ
कापूर
सुपारीची पाने
सुपारी
लवंगा
वेलची
कपडे
16 मेकअप किंवा सुहाग साहित्य
 बेलची पाने
फुले
भांग
धतुरा
आंबा
शमीची पाने
माचिस
आरती 
चालिसाचे पुस्तक
दान साहित्य
हवन साहित्य 


महाशिवरात्रीचे महत्त्व


महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजापाठ करुन हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीचे व्रत हे तरुणींसाठी अतिशय खास असते. ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्या लग्नातील सर्व अडथळे या व्रताने दूर होतात, अशी मान्यता आहे. 


महाशिवरात्रीला प्रदोष काल म्हणजेच सूर्यास्तानंतरची रात्र आणि दिवस मधली वेळ पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. यावेळी केलेल्या उपासनेने भगवान शिव प्रसन्न होतात आणि लवकरच आपल्या इच्छा पूर्ण करतात असं म्हणतात. महाशिवरात्री रात्रभर जागरण करून रात्रीच्या चारही तासात पूजा केल्याने भगवान शिव भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)