Makar Sankranti 2024 Sugad Puja Vidhi : हिंदू धर्मात संस्कृती, परंपरांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये याला अन्यय साधणार महत्त्व आहे. नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीचा आदला दिवस, मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस अशा तीन दिवसाला खास महत्त्व आहे. मकर संक्रांतीला सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही प्रथमच मकर संक्रांतीला सुगड पूजणार असाल तर जाणून घ्या गड पूजा, विधी आणि साहित्याबद्दल. (Makar Sankranti 2024 know about how do sugad puja occasion sugad puja vidhi and sahitya and vavsa of bride)


सुगड हा शब्द कुठून आला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा 'सुघट' असा आहे. शेती मालांनी भरलेला घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला 'सुगड' (Sugad) असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट ज्यांना सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हेत अशावेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतातील धान्य भरुन त्याची पूजा केली जाते. 


सुगड पूजेसाठी साहित्य लिस्ट 


मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन या.


हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका!


सुगड पूजेआधी ही तयारी करुन ठेवा!


तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात. तिथे हे साहित्य जमा करुन ठेवा. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगूळ-लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य एकत्र ठेवा. 


मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची?


आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करुन त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता पाच सुगडला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा. आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करा. त्यानंतर सुगडमध्ये एकएक करुन हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या ओंब्या घाला. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप, दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणींना वाण म्हणून देतात. 


हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी


नवरीचा ववसा म्हणजे काय?


नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदीकुंकूच्या दिवशी तिला हलव्याचे दागिनी घातले जातात. या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर वाण म्हणून देतात. तर कोकणात नवरीचा ववसा भरला जातो. पहिला ववसा हा पाच किंवा 25 चा असतो. पाचचा ववसा म्हणजे त्यात पाच विड्याची पाने, पाच सुपारी, पाच खारी, पाच वेलची, पाच लवंग, पाच हळकुंड, पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात. तर 25 च्या ववसात हे साहित्य 25 असतात. पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा ववसा तुम्ही आई, काकी, सासू, नंदन, मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही घेऊ शकतो. ववसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात.  


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)