Makar Sankranti 2024 Upay in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षभरात एकूण 12 संक्रांती असतात. याचा अर्थ दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. पण मकर संक्रांतीला वैदिक ज्योतिषशास्त्रात आणि हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायणानंतर मकर राशीत गोचर करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून यंदाही तिसऱ्यांदा मकर संक्रांती ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. (Make shani dev Saturn happy on Makar Sankranti 2024 just do 1 thing surya sankranti )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला सूर्य आणि शनिदेवाची भेट होते असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाला काळ्या तिळाने सूर्याची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्तता मिळते, असं म्हणतात. त्याशिवाय मकर संक्रांतीला सूर्यदेव आणि शनिदेव यांची कथा वाचल्याने घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात. 


मकर संक्रांतीची कथा


पौराणिक कथेनुसार, सूर्यदेव आणि शनिदेव हे पिता-पुत्र मानले जातात. पण दोघांच्या नात्यात दुरावा असल्याचं कथेमध्ये सांगण्यात आलं आहे. या दुरावामागील कारण म्हणजे शनिदेवाची माता छाया यांच्याशी सूर्यदेवाचं वागणं विचित्र होतं. जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा सूर्यदेवाने पाहून माता छाया यांना म्हटलं हा काळा रंगाचा मुलगा माझा होऊ शकत नाही. त्यांनी शनिदेवाला आपला पुत्र म्हणून स्विकारलं नाही. त्यानंतर सूर्यदेवाने शनिदेव आणि माता छाया यांना वेगळं केलं. तेव्हापासून शनिदेव आणि माता छाया कुंभ नावाच्या घरात राहायला लागले. मात्र सूर्याच्या या वागण्याने दुखावलेल्या माता छायाने त्यांना कुष्ठरोग झाल्याचा शाप दिला.


सूर्यदेवांना कुष्ठरोगाचा त्रास?


आपल्या वडिलांना कुष्ठरोग झालेला पाहून सूर्यपुत्र यमराज खूप दुःखी झाला होता. यमराज हा सूर्याची पहिली पत्नी संग्या यांचा पुत्र आहे. यमराजांनी सूर्यदेवांना कुष्ठरोगापासून मुक्त केलं असं म्हणतात. जेव्हा सूर्यदेव पूर्णपणे निरोगी झाले तेव्हा त्यांनी आपली दृष्टी पूर्णपणे कुंभ राशीवर केंद्रित केली, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं. यामुळे शनिदेवाच्या घरातील कुंभ जळून राख असं म्हणतात. यानंतर शनी आणि त्याची आई छाया यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. 


काळे तीळ आणि सूर्यदेवाचा संबंध!


यमराज यांनी आपली सावत्र आई छाया आणि भाऊ शनी यांची दुर्दशा पाहून पिता सूर्याला त्या दोघांच्या कल्याणासाठी क्षमा करण्याची विनंती केली. यानंतर सूर्यदेव शनीला भेटायला गेले. जेव्हा शनिदेव आपले वडील सूर्यदेव येताना पाहतात तेव्हा ते आपल्या जळलेल्या घराकडे पाहतो. ते घराच्या आत जातात, तिथे एका भांड्यात काही तीळ ठेवलेले होते. जे आगीत काळे झाले होते. शनिदेव आपल्या वडिलांचं स्वागत हे त्या काळ्या तीळांने करतो. 


अशा प्रकारे शनिदेवाला मिळालं 'मकर' घर !


भगवान सूर्य शनिच्या या वागण्याने प्रसन्न होतात आणि शनिदेवाला दुसरं घर देतात. कुंभ घर जळल्यामुळे शनिदेवाचं नवीन घर मकर सूर्यदेवाने दिलं होतं. यामुळे प्रसन्न होऊन शनिदेव सांगतात की जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना करेल त्याला शनीच्या महादशापासून आराम मिळतो. त्याचे घर ऐश्वर्याने समृद्ध होतं. म्हणून जेव्हा सूर्यदेव आपल्या मुलाच्या पहिल्या घरात म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)