कुंडलीत मंगळ दोष असल्यास अडचणी येत आहेत? त्या टाळण्यासाठी करा `हे` उपाय
Mangal Dosh Remedies : अनेकांच्या कुंडलीत मंगळ असतो. त्यामुळे त्यांनी अनेक अडचणी येतात. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला वैवाहिक जीवनात अडचणी येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोषामुळे पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन भांडणे होतात. मंगळ दोष कमी करण्यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Mangal Dosh : एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास त्याला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा शनी, राहू आणि केतूप्रमाणेच वाईट ग्रह मानला जातो. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासक ग्रह आहे. कुंडलीत मंगळ दोष असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. यामुळे व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबली जाते. याशिवाय मालमत्तेशी संबंधित वादांनाही सामोरे जावे लागेल. कुंडलीतील मंगळ दोषाची काही लक्षणे असतात. मंगळ दोष दूर करण्यासाठी उपाय केले तर तुमच्या अडचणी दूर होतील.
कुंडलीत मंगळ दोषामुळे या अडचणींचा सामना
- कुंडलीत मंगळ दोषामुळे अनेकांची लग्न जमत नाहीत. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीच्या लग्नाला उशीर होतो. त्यासोबतच अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
- कुंडलीत मंगळ दोष असेल तर अशी व्यक्ती पटकन रागावते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला जास्त राग येतो. त्यामुळे लोक दुरावत चालले जातात.
- कुंडलीत मंगळ दोष असेल तर अशा व्यक्तीला डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. याशिवाय हाय बीपी, लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजारही होऊ शकतात.
- जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर अशा व्यक्तीला कोर्ट केसेसमध्ये तुरुंगात जावे लागते, असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगण्यात येते
मंगळ दोष कमी करण्याचे हे उपाय
- एखाद्याच्या कुंडलीत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल अर्पण करावे. यासोबत लाल रंगाचे फूल अर्पण करावे, असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगण्यात येते.
- कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली नसेल तर त्या व्यक्तीने दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजीची पूजा केली पाहिजे. हतुमान प्रसन्न होऊन तुमचे संकट दूर करतो.
- ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली नसेल तर अशा व्यक्तीने मसूर, गहू, लाल रंगाचे कपडे, गूळ इत्यादी दान करावे.
- कुंडलीत मंगळ दोष असेल आणि विवाहात अडथळा येत असेल तर हनुमानजींची विधि-विधानानुसार पूजा करावी आणि त्यांना लाल सिंदूर अर्पण करावा. त्यामुळे विवाह जुळण्यास मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)