Mangal Gochar 2023 : मंगळ गोचर! `या` राशींच्या लोकांना धनलाभ, तर काही राशींच्या लोकांवर कोसळणार संकट
Mangal Gochar 2023 : शुक्र गोचरनंतर आता मंगळ राशीचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. त्यातच बुधवारी शनी गोचर असल्याने पुढील काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. तर काही राशींसाठी अशुभ असणार आहे. मंगळ गोचरमुळे काय कुठल्या राशीला लाभ होणार आहे ते पाहूयात.
Mangal Gochar 2023 zodiac signs effect in marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला खूप महत्त्व आहे. गोचर म्हणजे एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या संक्रमणला ज्योतिषी भाषेत गोचर असं म्हणतात. शुक्र ग्रहाने मेष राशीत (Shukra Gochar 2023) प्रवेश केला आहे. तर बुधवारी शनी गोचर (Shani Gochar 2023) होणार आहे. आता सोमवारी (horoscope 13 march) मंगळ गोचर झालं आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे आपल्या आयुष्यावर चांगला आणि वाईट परिणाम होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. मंगळ हा ग्रहाचा सेनापती आहे, असं शास्त्रात मानतात. मंगळ ग्रह हा इमारत, जमीन आणि नातेसंबंधासाठी कारक आहे. त्यामुळे चला मंगळ गोचरमुळे कुठल्या राशींवर काय परिणाम होणार जाणून घेऊयात. (Mangal Gochar 2023 horoscope 13 march these zodiac signs money and some zodiac signs Facing the crisis astrology news in marathi)
मेष (Aries)
मंगळ गोचर या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रॉपर्टीमध्ये काम करणाऱ्यांना धनलाभ होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुम्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी धैर्याने पुढे जाणार आहात.
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे. मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चढ उतार येण्याची शक्यता आहे. त्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होणार असल्याने तुम्ही मानसिक तणावात राहणार आहात.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांचे इतरांशी वादविवाद होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे त्यांनी वागण्यावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे. नवीन व्यवसाय किंवा घर-जमीन खरेदी करु नका, कारण तुम्हाला मोठं नुकसान होण्याची भीती आहे.
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचरमुळे संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. अन्यथा त्याचावर आर्थिक संकट कोसळण्याची भीती आहे. त्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर फलदायी असणार आहे. मात्र लव्ह लाइफकडे जरा लक्ष द्या. रखडलेली काम मार्गी लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही मंगळ गोचर शुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांसाठीही मंगळ गोचर आनंददायी असणार आहे. नवीन ओळखी होणार आहे. समाजात तुमचे मान सन्मान वाढणार आहे. रखडलेले कामं मार्गी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी मात्र मगंळ गोचर संकट घेऊन येणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रवासादरम्यान अपघाताची शक्यता आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवासात काळजी घ्या. ऑफिसमध्ये कुठलाही निर्णय घेताना शंभर वेळा विचार करा,
धनु (Sagittarius)
या राशीच्या लोकांसाठी पुढील 45 दिवस कठीण असणार आहे. या दिवसात कुठलाही निर्णय घेताना शांतपणे विचार करुन घ्या. मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या संसार अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जरा काळजी घ्या, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
मकर (Capricorn)
मंगळ गोचर हे मकर राशीसाठी फलदायी ठरणार आहे. प्रत्येक कामात या राशीच्या लोकांना यश मिळणार आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा प्रॉब्लेम होऊ शकतात.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)