Mangal Gochar 2023 : बुधवार 10 मे 2023 हा दिवस ग्रह गोचरसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बुध उदय आणि मंगळ गोचर यामुळे प्रत्येक राशींवर याचा सकारत्मक किंवा नकारत्मक परिणाम होतो. 10 मे ला दुपारी 1.48 वाजता मंगळ मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा कर्क राशीत 1 जुलैपर्यंत असणार आहे. मंगळ गोचरमुळे काही राशींवरील आर्थिक संकट दूर होणार आहे तर काही राशींचं आर्थिक नुकसान होणार आहे. (Mangal Gochar 2023 Mars effect 12 zodiac signs good and bad Horoscope 10 May 2023)


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लोकांची नोकरी आणि व्यवसायात भरभराटी होणार आहे. जमीन मालमत्ता संबंधित प्रकरणावर तोडगा निघणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. 


वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. मेहनतीचं फळं मिळणार आहे. मात्र या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर त्रासदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना काळजी घ्या. कुठल्याही वादात अडकू नका. 


कर्क (Cancer)


या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचरचा काळ कठीण ठरणार आहे. आरोग्यापासून आर्थिक फटका बसणार आहे. प्रवास आणि वाहन चालवताना काळजी घ्या. 


सिंह (Leo)


सिंह राशीसाठी मंगळ गोचर शुभ नाही आहे. त्यांचासाठी पुढील चार महिने त्रासदायक ठरणार आहेत. वादविवाद आणि मतभेद टाळा. आर्थिक नुकसान होणार आहे. 


कन्या (Virgo)


कन्या राशीसाठी मंगळ गोचर शुभ असणार आहे. कामात तु्म्ही अजून लक्ष देणार आहात. हा काळ तुमच्यासाठी चढ उतार घेऊन आला आहे. 


तूळ (Libra)


या राशीसाठी मंगळ गोचर संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. जमीन मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वाहन खरेदीचा योग आहे. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाची प्रशंसा होणार आहे. गुंतवणुकीतून तुमचा फायदा होणार आहे. 


धनु (Sagittarius)


या राशीच्या लोकांना मंगळ गोचरचा चांगला परिणाम दिसणार आहे. जुन्या आजारातून तुमची सुटका होणार आहे. कोर्टाचं प्रकरण मार्गी लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 


मकर (Capricorn)


या राशीवर मंगळ गोचरचा नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. कामासंबंधी विचारपूर्वक निर्णय घ्या. 


कुंभ (Aquarius)


या राशीच्या लोकांना पुढील चार महिने चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. कामाच्या ठिकाणी अपेक्षित प्रगती होईल. कोर्टातील निकाल तुमच्या बाजूने लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 


मीन (Pisces)


या राशीच्या लोकांना मंगळ गोचर फलदायी ठरणार आहे. आर्थिक लाभासोबतच प्रगतीचे अनेक मार्ग उघडणार आहे. नवीन नोकरीची संधी आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)