Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना `या` राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट
Margashirsha 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना करण्याचा हा महिना 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होतो आहे. काही राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी ठरणार आहे.
Margashirsha 2023 : हिंदू धर्मात श्रावणानंतर अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा मार्गशीर्ष महिना मानला जातो. या महिन्यात लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिला घटस्थापना करुन माता लक्ष्मीचे व्रत करते. या महिन्यात माता लक्ष्मीसोबत श्री कृष्णाचीही पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. तर मार्गशीर्षाच्या पहिलाच दिवशी ग्रहांचा राजकुमार बुध वक्री (Budh Vakri 2023) होणार आहे. अशातच वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना हा काही राशींच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. (Margashirsha Month Lucky for 3 zodiac signs or Rashis Financial prosperity along with advancement in career)
'या' राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी!
मेष रास (Aries Zodiac)
मार्गशीर्षात अनेक राजयोगाची निर्मिती होते आहे. तर मेष राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी ठरणार आहे. त्यांच्यासाठी यशाचे अनेक मार्ग खुले होणार आहेत. ही लोक करिअरमध्ये भरपूर प्रगती करणार आहेत. व्यावसायिकांनाही हा महिना आर्थिक फायदा करणार आहे. तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होणार असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत लाभणार आहे. तुमच्या कानावर आनंदाची बातमी पडणार आहे.
हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
तूळ रास (Libra Zodiac)
तूळ राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना खूप चांगला सिद्ध होणार आहे. या महिन्यात तुम्हाला राजयोगाचे अनेक फायदे लाभणार आहेत. या महिन्यात तुम्हाला तुमच्या सर्व मेहनतीचं फळ प्राप्त होणार आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरीची जबरदस्त ऑफर मिळणार आहे. तुमची कारकीर्द यशाच्या नवीन शिखर चढणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होणार आहे.
हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबा षडरात्र उत्सव म्हणजे काय ? खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी?
धनु रास (Sagittarius Zodiac)
मार्गशीर्ष महिन्यात धनु राशीच्या लोकांचे नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत स्थितीत येणार आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक नवीन संधी प्राप्त होणार आहे. ज्याचा तुम्ही भविष्यातही दुप्पट फायदा मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचं स्थान मजबूत होणार आहे. शिवाय तुमचा सन्मानही वाढणार आहे. लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढणार आहे. या महिन्यात तुमची सर्व अपूर्ण कामं मार्गी लागणार आहेत.
(Disclaimer - या ठिका णी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)