तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार? शरीराचे अवयव असे देतात संकेत
आयुष्यात पुढे होणाऱ्या घटनांचे संकेत देतात शरीराचे अवयव
Meaning of Body Parts Twitching : आपल्या आयुष्यात पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. पण जीवनात काय होणार? याची कोणालाच कल्पना नसते. पण आपल्या आयुष्यात काय होणार याचे संकेत आपल्या शरीराचे अवयव देत असतात. जर आपण हे संकेत समजून घेतले तर सावधान होवू शकतो, किंवा चांगल्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी तयार होवू शकतो. तर आज जाणून घेवू शरीराचे कोणते अवयव आपल्याला आयुष्यातील पुढच्या घटनांचे संकेत देतात. (good or bad things in life)
डावा गाल फडफडत असल्यास (Astrology)
जर स्वस्थ व्यक्तीचा उजवा गाल फडफडत असेल, तर स्त्रीला त्याचा फायदा होतो. जर एखाद्या व्यक्तीला मूल होणार असेल आणि त्याच्या डाव्या गालाच्या मध्यभागी फडफडत असेल, तर त्याच्या घरी लक्ष्मी येण्याची शक्यता असते.
जर एखाद्या व्यक्तीचे वरचे ओठ फडफडत असतील, तर एखाद्याशी वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दोन्ही ओठ फडफडले तर कुठूनतरी चांगली बातमी येण्याची दाट शक्यता असते. (Meaning Of Body Parts Twitching)
तळहाताला खाज येते असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या तळहातावर खाज येत असेल तर ते शुभ शगुन आहे. त्याला येणाऱ्या काळात संपत्ती प्राप्त होण्याची शक्यता असते. जर डाव्या हाताच्या तळहातावर खाज येत असेल आणि ती व्यक्ती आजारी असेल तर लवकर प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता असते.
जेथे कंबरेच्या ( Shoulder Twitching) उजव्या बाजूला काही हलचाल जाणवत असेल तर, काही संकटं येवू शकतात आणि जर डाव्या बाजूला हलचाल जाणवत असेल तर, चांगली बातमी कानावर येवू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. 24TAAS त्याची पुष्टी करत नाही.)