Budh-Rahu Yuti: नववर्षाच्या सुरुवातीला होणार बुध-गुरुची युती; `या` राशी मालामाल होण्याची शक्यता
Budh Rahu Yuti 2024: 2024 च्या सुरुवातीला राहू आणि बुधाचा संयोग होणार आहे. कारण राहू ग्रह आधीच मीन राशीत भ्रमण करत असून वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध देखील मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Budh Rahu Yuti 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशीमध्ये बदल करतात. येत्या नवीन वर्षात देखील अनेक ग्रह गोचर करणार आहे. यावेळी ग्रह इतर ग्रहांशी संयोग करणार आहेत. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येणार आहे.
2024 च्या सुरुवातीला राहू आणि बुधाचा संयोग होणार आहे. कारण राहू ग्रह आधीच मीन राशीत भ्रमण करत असून वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध देखील मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहांचा संयोग मीन राशीत तयार होणार आहे. अशा स्थितीत या ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
राहु आणि बुध यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या राशीच्या धन घरावर तयार होणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या भाग्याचा लाभ मिळणार आहे. हे संयोजन व्यावसायिक जीवनासाठी सर्वोत्तम मानले जाते. तुमचा व्यवसाय आणि मालमत्ता वाढेल आणि यावेळी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
तूळ रास (Tula Zodiac)
तूळ राशीच्या लोकांसाठी राहू आणि बुध यांचे संयोग अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळणार आहे. यावेळी तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे. कुटुंबातील सर्वांशी तुमचे संबंध प्रेमळ असतील. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते.
वृषभ रास (Taurus Zodiac)
राहू आणि बुध यांची युती तुमच्यासाठी यशस्वी ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल, तर तिथून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती करू शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )