Budh Gochar : ग्रहांचा राजकुमार कन्या राशीत करणार प्रवेश; श्रीमंतीसह बुध देणार नशिबाला कलाटणी
Budh Gochar : ज्योतिषीय शास्त्रानुसार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं गोचर काही राशींसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे.
Budh Gochar : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतो. बुधाच्या हालचालीला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध सूर्य आणि शुक्र यांच्याशी अनुकूल आहे, तर चंद्र आणि मंगळ यांच्याशी प्रतिकूल मानले जाते.
ज्योतिषीय शास्त्रानुसार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं गोचर काही राशींसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. अशा स्थितीत 6 दिवसांनंतर काही राशींचे भाग्य बुधाच्या कृपेने चमकणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी कन्या राशीत बुधाचं गोचर लाभदायक ठरणार आहे.
वृषभ रास
कन्या राशीत बुधाच्या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात खूप प्रगती होणार आहे. यासोबतच या काळात नोकरीतही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठीही वेळ शुभ राहील. भागीदारीची कामं करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहील. आर्थिक लाभ होणार आहेत. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.
सिंह रास
बुधाचं गोचर जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होणार आहे. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. या काळात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. बुध संक्रमणाच्या काळात तुम्हाला व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ मिळतील. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
कन्या रास
या काळात व्यवसाय आणि नोकरीमध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून येतील. दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. जमिनीशी संबंधित कामातून लाभ होईल. तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळेल. भागीदारी व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने विशेष आर्थिक लाभ मिळेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)