Budh Gochar In Kanya: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाला गोचर असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचं कारक मानलं गेलंय. तो कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी काळात बुध ग्रह गोचर करणार आहे. येत्या 1 ऑक्टोबर रोजी व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मेष रास (Aries Zodiac)


बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे अशा लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. ऑफिसमध्ये तुमची मेहनत आणि कामाचा विचार करता तुमच्या पदात वाढ होऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते.


वृषभ रास (Taurus Zodiac)


कन्या राशीत बुध ग्रहाचा प्रवेश वृषभ राशीच्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. तुमच्या मुलाची यावेळी प्रगती होऊ शकते. या काळात तुम्ही कोणत्याही कामात गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या मनाजोग्या होणार आहेत. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. मीडिया, मार्केटिंग आणि कम्युनिकेशनशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. कुटुंबातील वातावरण चांगलं राहणार आहे.


सिंह रास (Leo Zodiac)


बुधाचं गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. त्याचप्राणे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून अपेक्षित कामगिरी होणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. लव्ह लाईफ चांगली राहणार आहे. तुम्ही व्यवसायात नवीन कल्पना लागू करून पैसे कमवू शकता. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )