Budh Vakri: अवघ्या काही तासांनी बुध चालणार वक्री चाल; `या` राशींना सतर्क राहण्याचा सल्ला
Budh Vakri 2023: बुधाच्या वक्री चालीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होणार आहेत. बुध हा पिता, गुरू, सरकारी नोकरी, आत्मविश्वास, लांबचा प्रवास या गोष्टींशी कारक मानला जातो.
Budh Vakri 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. सध्या बुध धनु राशीत असून 13 डिसेंबर रोजी दुपारी 12:01 वाजता मार्गस्थ होणार आहे. बुधाच्या वक्री चालीमुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच येऊ येणार आहे.
बुधाच्या वक्री चालीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होणार आहेत. बुध हा पिता, गुरू, सरकारी नोकरी, आत्मविश्वास, लांबचा प्रवास या गोष्टींशी कारक मानला जातो. त्यामुळे बुधाच्या वक्री चालीने शिक्षक, राजकारणी, धार्मिक नेते इत्यादींच्या जीवनावर अधिक होण्याची शक्यता आहे.
मेष रास (Mesh Zodiac)
बुधाच्या वक्री चालीमुळे या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या राशीच्या लोकांनी आपले शब्द सावधगिरीने वापरावे अन्यथा कोणीतरी तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावू शकतो. यावेळी नात्यात चढ-उतार येऊ शकतात. तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहा. तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात अडकू नका.
वृषभ रास (Vrishabh Zodiac)
बुधाची वक्री चाल या राशीसाठीही लाभदायक ठरणार नाही. जीवनात अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला पराभूत करण्यासाठी नवीन मार्ग शोधतील. तुमच्या बोलण्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. जास्त खर्चामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्याल. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येतील.
कर्क रास (Kark Zodiac)
बुधाची वक्री चाल या राशीच्या लोकांसाठीही चांगली होणार नाही. जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. केलेलं कामही बिघडू शकते. किरकोळ गैरसमजामुळे भाऊ किंवा बहिणीशी संबंध बिघडू शकतात. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रवासात थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी अडचणींचा काळ येणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )