Vastu Tips For Wallet: वास्तूसंदर्भातील शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितलं जातं ज्यांच्याकडे लक्ष दिल्यास आयुष्य अधिक सुखी आणि समृद्ध होतं. तसेच या छोट्या छोट्या गोष्टींचा काळजीपूर्वपणे विचार केल्यास जीवनात अधिक शांती आणि सामाधान लाभतं असं म्हटलं जातं. अनेकदा अशा गोष्टींची माहिती नसल्याने लोकांकडून चूका होतात. या चूका असा असतात की त्याचा त्यांच्या जीवनावर आणि खिशावरही प्रभाव पडतो. या नकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीकडे पैसे टिकत नाहीत किंवा वारंवार आर्थिक संकटांचा सामना अशा व्यक्तींना करावा लागतो. 


पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवते हे फार महत्त्वाचं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तू जाणाकारांच्या सांगण्यानुसार पर्समध्ये एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टी ठेवते हे ही फार महत्त्वाचं असतं. पर्समध्ये काही गोष्टी ठेवल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि व्यक्तीकडे पैसा टिकत नाही असं म्हटलं जातं. लक्ष्मी अशा व्यक्तींवर कायम नाराज असते असंही म्हटलं जातं. अशा वेळेस नेमकं आपल्याबरोबर असं का घडतंय हे सुद्धा अनेकांना समजत नाही. आज आपण एखाद्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवल्या जाणाऱ्या काही गोष्टींचा कशापद्धतीने नकारात्मक परिणाम होतो याबद्दल जाणून घेणार आहोत. या वस्तू व्यक्तीच्या आर्थिक स्थैर्यावर नकारात्मक परिणाम करतात असं म्हटलं जातं. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर...


पर्समध्ये चुकूनही ठेऊ नका या वस्तू...


> वास्तू जाणकारांच्या सांगण्यानुसार कोणत्याही व्यक्तीने आपल्या पार्समध्ये (पाकिटात) बिलाचे कागद ठेवता कामा नये. बिल आणि खर्च झालेल्या गोष्टींसंदर्भातील तपशील पर्समध्ये ठेवल्याने नकारात्मकता वाढते.


> पाकिटामध्ये बिलं ठेवल्यास त्याचा प्रभाव व्यक्तीच्या खिशावर आणि पैशांवर पडतो.  वास्तू जाणकारांच्या माहितीनुसार अशाप्रकारची बिलं आणि फार महत्त्वाचे नसणारे कागद पर्समध्ये ठेवू नये.


> ज्योतिष शास्त्रानुसार कधीच उधारीवर घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवू नयेत. उधारीचे पैसे पर्समध्ये ठेवल्याने उधारीची रक्कम वाढत राहते असं म्हटलं जातं. तसेच अशा व्यक्तींना मोठा आर्थिक फटका बसण्याचीही शक्यता अधिक असते.


> वास्तू एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार कधीच आपल्या पाकिटामध्ये देवी-देवतांचे फोटो ठेवू नयेत. याच कारणामध्ये आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. तसेच पाकिटामध्ये देवी-देवतांचे फोटो ठेवल्यास कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो असं या क्षेत्रातील जाणकार सूचवतात.


> आपल्या जवळची एखादी व्यक्ती मरण पावल्यास तिचा फोटो पर्समध्ये ठेवण्याची पद्धत काहीजण फॉलो करतात. मात्र अशाप्रकारे मृत व्यक्तीचा फोटो पर्समध्ये ठेऊ नये. मरण पावलेली व्यक्ती कितीही जवळची आणि खास असली तरी मृत व्यक्तीचा फोटो पाकिटात ठेऊ नये. असं केल्यास व्यक्तीवर अनेक संकटं येऊ शकतात. तसेच व्यक्तीच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा राहते असंही म्हटलं जातं.


> पर्समध्ये टोकदार वस्तू ठेवू नयेत. टोकदार वस्तू या भाग्याच्या दृष्टीने फार सकारात्मक नसतात असं म्हटलं जातं. टोकदार वस्तू पाकिटात ठेवल्याने आर्थिक नुकसान होतं आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते असं म्हटलं जातं. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)