August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना `या` राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, नशिबाची मिळणार पूर्ण साथ
Monthly August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना हा अनेक राशींसाठी वरदान ठरणार आहे. अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे.
August Horoscope 2023, August Masik Rashifal : ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थिती पाहता ऑगस्ट महिन्या अनेक राशींसाठी धनयोग घेऊन आला आहे. चार मोठे ग्रह या महिन्यात आपली स्थिती बदलणार आहे. संपत्तीचा कारक शुक्र ग्रह काही राशींच्यासाठी आर्थिक फायदा घेऊन आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे. (Monthly Horoscope in Marathi)
मेष (Aries)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फलदायी असणार आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. तुमच्या कौशल्यात वाढ होऊन नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गासाठी दुसऱ्या आठवडा हा प्रगती आणि यश घेऊन आला आहे. मात्र व्यावसायिकांसाठी ऑगस्ट महिना खर्चिक असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना सामान्य असणार आहे. करिअर आणि आर्थिकदृष्ट्या हा महिन्या ठिकठाक असेल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. या महिन्यात काही नुकसान होण्याची भीती असेल. जुना आजार परत त्रासदायक ठरणार आहे. घरातील वातावरण साधारण असेल. जोडीदाराला वेळ द्या.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फलदायी असणार आहे. पदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची चिन्ह आहेत. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असून तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे. आर्थिक बाबतीत हा महिन्यात फलदायी असेल. घरातील वातावरण आनंदी असेल.
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना सुरुवातीला संघर्षमय असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. कामाचा तणाव वाढणार आहे. नोकरीत बदल होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ बदल घडविणारा असणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना समाधानकारक असेल. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार असून तुम्हाला बढती मिळणार आहे. वरिष्ठांनी कुठल्या तरी कारणाने मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यवसायांना हा महिन्या फायद्याचा असणार आहे. त्यांचा नफा होणार आहे. वडील धारी मंडळीकडून तुम्हाला मदत होईल.
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. सुरुवातीचा आठवडा चांगला असला तरी महिन्याच्या मध्यम थोडा थंडा असणार आहे. अनपेक्षिक घटना तुमचा वेग कमी करणारा ठरणार आहे. आर्थिक स्थिती थोडी सुधारणार आहे. मात्र अनपेक्षिक अनेक खर्च होणार आहे. घरात तणावपूर्ण वातावरण असेल.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना साधारण असणार आहे. करिअरमध्ये काही अपयश मिळेल. तुमच्या योजना या महिन्यात चुकणार आहेत. या महिन्यात काम करताना सावधगिरी बाळगा. स्वत:हून काही जबाबदारी उंचला. व्यवसायिकांना या महिन्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. महिन्याचा शेवटी परिस्थिती थोडी सुधारेल.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्या इतर महिन्यापेक्षा संथ असणार आहे. तुम्हाला या महिन्यात थोड अस्वस्थ आणि उदास वाटू शकतं. अगदी एकटे पणाची भावना तुमच्या मनात येऊ शकते. अनपेक्षित समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. नियोजत काम व्हायला देखील उशीर होणार आहे. व्यावसायिकांनी कामात सावधगिरी बाळगावी. कुटुंबात सामान्य वातावरण असेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
धनु (Sagittarius)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना लकी ठरणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. स्वप्नपूर्तीचा हा महिना असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. व्यावसायिक नवीन प्रकल्पाचा विचार करणार आहे. त्यांना कामातून नफा मिळणार आहे.
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कठीण असणार आहे. करिअरमध्ये चढ - उतारांचा सामना करावा लागणार आहे. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च होणार आहे. आर्थिक स्थिती बिघडणार असल्याने तुम्ही काळजीत पडणार आहात. पाटर्नरशीपमध्ये व्यवसायिकांना वादाचा सामना करावा लागणार आहे. महिन्याच्या शेवटी परिस्थिती थोडी सुधारेल. आरोग्यही तुम्हाला साथ देणार नाही.
कुंभ (Aquarius)
या राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना संघर्षाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी टिकण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. कार्यक्षेत्रात सहकारी तुम्हाला सहकार्य करणार नाही. वाणीवर नियंत्रण ठेवा. कठोर शब्द वापरू नका. व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांचा विरोधाचा सामना करावा लागणार आहे. घरातील वातावरण तणावपूर्ण असेल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.
मीन (Pisces)
या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना निराशाजनक असणार आहे. कार्यक्षेत्रात अनपेक्षित गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर कामासंदर्भात दबाव टाकणार आहेत. नोकरीतील समाधान कमी होऊ शकतं. कितीही मेहनत केली तरी ध्येय साधता येणार नाही. तुमचं बँक बलेन्स गडबडणार आहे. व्यवसायिकांनाही या महिन्यात खूप मेहनत करावी लागणार आहे.