Panchak June 2022: हिंदू पंचांनुसार, प्रत्येक महिन्यात पाच दिवस असे असतात ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या कालखंडाला पंचक म्हणतात. पंचकचे पाच प्रकार आहेत. रोग पंचक, राज पंचक, अग्नि पंचक, मृत्यु पंचक आणि चोर पंचक. यापैकी मृत्यू पंचकाबाबत लोकांमध्ये सर्वाधिक भीती असते. आता सुरु असलेलं पंचक हे मृत्यू पंचक. उमृत्यू पंचक 18 जूनपासून सुरू झालं आहे आणि 23 जून 2022 पर्यंत असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यू पंचक हा सर्वात अशुभ काळ मानला जातो


शनिवारपासून झालेल्या पंचकाला मृत्यु पंचक म्हणतात. या पंचकाला सर्वात अशुभ मानले जाते. या काळात अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 23 जून 2022 पर्यंत कोणतेही शुभ कार्य करु नये.


पंचक काळात हे काम करू नये


  • पंचक काळात लाकूड किंवा लाकडापासून बनवलेल्या वस्तू कधीही खरेदी करू नयेत.

  • पंचक काळात घराचे छत लावू नका किंवा दरवाजाला फ्रेम लावू नका.

  • पंचक काळात पलंग, खाट, फर्निचर खरेदी करू नका. असे केल्याने खूप अशुभ परिणाम मिळतात.

  • पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर योग्य ब्राह्मणाला विचारून धार्मिक विधीनुसार अंतिम संस्कार करावेत. मृत व्यक्तीला चार नारळ किंवा लाडू टाकून अंत्यसंस्कार करावेत.

  • पंचक काळात कधीही दक्षिण दिशेला प्रवास करू नये. ती यमराजाची दिशा मानली जाते.


2022 या वर्षातील पंचक


  • जुलै 2022 - 15 जुलै शुक्रवार ते 20 जुलै बुधवार

  • ऑगस्ट 2022 - 12 ऑगस्ट शुक्रवार ते 16 ऑगस्ट मंगळवार

  • सप्टेंबर 2022 - शुक्रवार 9 सप्टेंबर ते मंगळवार 13 सप्टेंबर

  • ऑक्टोबर 2022 - गुरुवार 6 ऑक्टोबर ते सोमवार 10 ऑक्टोबर

  • नोव्हेंबर 2022 - 2 नोव्हेंबर बुधवार ते 6 नोव्हेंबर रविवार

  • डिसेंबर 2022 - 26 डिसेंबर सोमवार ते 31 डिसेंबर शनिवार


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)