Nag Panchami 2022: श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. धार्मिक व्रत कैवल्यांच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा केला जातो. यंदा नागपंचमी 2 ऑगस्ट 2022, मंगळवार या दिवशी आहे. हिंदू धर्मात नाग देवतेचा संबंद देवी-देवतांशी जोडला गेला आहे. यासाठी नागाची पूजा केली जाते. भगवान शंकरानाही गळ्यात नाग धारण केला आहे. दुसरीकडे भगवा विष्णू देखील शेषनागावर विराजमान आहेत. आराध्य दैवत गणपतीने देखील नागाचं जनेऊ धारण केलं आहे. त्यामुळे नाग हिंदू धर्मात किती महत्त्वाचा आहे, याचा अंदाज येतो. नागपंचमीला पूजा करताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊयात नागपंचमीला पूजा करताना कोणत्या चुका करू नयेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपंचमी शुभ मुहूर्त


नागपंचमीचा दिवस नागांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी व्रत करावे. नागाच्या मूर्तीची पूजा करा. शिवलिंगावर अभिषेक करावा आणि नागदेवतेची प्रार्थना करावी. असे केल्याने भगवान शिव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी इत्यादींचा आशीर्वाद प्राप्त होतो.  या वर्षी नागपंचमी 2 ऑगस्ट 2022 मंगळवारी साजरी केली जाईल. पुजेसाठी शुभ मुहूर्त 2 ऑगस्टला सकाळी 6 वाजून 5 मिनिटाने ते 8 वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच जवळपास अडीच तास पुजेचा अवधी असेल.


नागपंचमीच्या दिवशी या बाबी लक्षात ठेवा


  • ज्या जातकांच्या कुंडलीत राहू-केतू ग्रह अशुभ स्थितीत आहेत, त्यांनी कधीही नागांना त्रास देण्याची चूक करू नये. त्यापेक्षा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीला दुधाने अभिषेक करून आपल्या कर्माची क्षमा मागावी. या जन्मी किंवा मागील जन्मी साप मारले गेले असतील किंवा काही इजा झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा अशी प्रार्थना करा.

  • नागपंचमीच्या दिवशी कधीही जमीन खोदू नका किंवा नांगरणी करू नका. विशेषत: ज्या ठिकाणी सापाचा वावर किंवा बिळ आहेत त्या ठिकाणी जमीन खणू नका.

  • सापांना कधीही मारू नका किंवा त्यांना इजा करू नका. त्यांना पकडून जंगलात सोडून द्या.

  • नागपंचमीच्या दिवशी सुईधाग्याचा वापर करू नये.

  • नागपंचमीच्या दिवशी लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण तयार करू नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)