Nagpanchami 2023 : ...यासाठी केली जाते नागाची पूजा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आख्यायिका
Nagpanchami 2023 : श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. इतर दिवशी आपण नागाला मारतो आणि आजचा दिवशी नागाची पूजा का करतो तुम्हाल माहिती आहे का?
Nagpanchami 2023 : आज श्रावणातील पहिला सोमवार असून सोबत आज नागपंचमीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. श्रावण सोमवार म्हणजे भोलेनाथाची पूजा करण्याचा वार. त्यासोबत आज नागपंचमी म्हणजे वासुकी नाग जो शंकराच्या गळ्यात असतो त्यांची पूजा करण्याचाही योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. (nagpanchami 2023 reason snakes are worshiped in nag panchami Nag Panchami Puja Vidh Shubh Muhurat and Importance in marathi)
ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दिवशी नागांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. नाग देवता भगवान शंकराच्या गळ्याभोवती विराजमान असतो. साधारण नाग कुठेही दिसला तरी लोक घाबरतात त्याला मारतात. मग असं असताना नागपंचमीला नागदेवांची पूजा का बरं केली जाते, तुम्हाला माहिती आहे का?
नागपंचमीला का करतात नागाची पूजा?
आधुनिक काळात यामागे काही खास कारणं सांगितली जातात. पण पौराणिक कथा आणि शतकानुशतकं चालत आलेली परंपरा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं असं म्हणतात साप आपल्या शेताचं रक्षण करतो. पिकांचं नुकसान करणारे उंदीर आणि कीटक साप खातो. म्हणून त्यांना क्षेत्रपाल असंही म्हणतात. त्यामुळे नागाची पूजा केली जाते.
तर दुसरं कारण म्हणजे सापांना सुगंध खूप आवडतो. याच कारणामुळे आपल्या पुराणात सापांना खूप उच्च स्थान देण्यात आलंय, त्यामुळे लोक त्यांची पूजा करतात.
नागपंचमीला नागदेवतेची पूजा कशी करावी?
नागपंचमीला नागाची पूजासोबत काल सर्प दोष आणि राहू दोषाचीही पूजा केली जाते. पंचमी तिथीला म्हणजेच नागपंचमीला दिवसभर व्रत केलं जातं. संध्याकाळी उपवास सोडला जातो. आजच्या दिवशी लोक भिंतीवर किंवा एखाद्या कागद्यावर नागाचं चित्र काढतात. त्यानंतर नागदेवतेला आवाहन केलं जातं. त्यांना हळद, लाह्या, तांदूळ यांनी पूजा केला जाते. फुलं, उदबत्ती दाखवून पूजा केली जाते. नागदेवतेला कच्च्या दुधात साखर मिसळून नैवेद्य अर्पण केलं जातं. त्यानंतर आरती करुन घरातील सदस्यांना लाह्याचा प्रसाद दिला जातो. काही ठिकाणी मंदिरात जाऊन नागाला दूध पाजलं जातं.
नागपंचमीचे महत्त्व (Importance Of Nagpanchami )
पौराणिक कथेनुसार नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या नागदेवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. असं म्हटलं जातं की, जे लोक नागपंचमीला भगवान भोलेनाथ आणि नागाची पूजा करतात. सोबत रुद्राभिषेक करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात.