Navratri 2022 Date: गणपती-गौरी (Ganapati-Gauri) झाल्यावर वेध लागतात ते नवरात्रीचे. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोलकतामध्ये (Kolkata) नवरात्रीत एक वेगळाच जल्लोष पाहिला मिळतो. तर महाराष्ट्रात (Maharashtra) घरोघरी घटस्थापना केली जाते. तुम्हाला माहिती आहे का वर्षभरात चार नवरात्र असतात ते. हो कारण 2 नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून ओळखली जातात, तर एक चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) असते आणि एक शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) म्हणून ओळखली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून होत आहे. नवरात्रीमध्ये (Navratri 2022 Shubh Muhurta) दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा (nine forms of Goddess Durga) जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल आणि नवमी तिथी म्हणजे 05 ऑक्टोबर 2022 (05 October 2022) पर्यंत साजरी केली (Ghat Sthapna 2022 Shubh Muhurta) जाणार आहे. म्हणजे  05 ऑक्टोबर 2022 दसरा (Dussehra) असणार आहे. नवरात्रीच्या काळात भक्त दुर्गा देवीची पूजा करतात आणि पूर्ण भक्तिभावाने उपवास करतात. काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. चला जाणून घेऊयात घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी. (navratri 2022 date ghatasthapana muhurat 26 September and pooja ritualnm)



शारदीय नवरात्रीची तिथी


प्रतिपदा तिथी आरंभ – 26 सप्टेंबर 2022, सोमवार, पहाटे 03:23 वाजता
प्रतिपदा तिथी समाप्ती- 27 सप्टेंबर 2022 मंगळवार, पहाटे 03:08 वाजता


घटस्थापनेचा शुभ मुहूर्त


घट स्थापना तारीख: 26 सप्टेंबर 2022, सोमवार
घटस्थापना मुहूर्त: 26 सप्टेंबर 2022 सकाळी 06:28 ते 08:01 पर्यंत


घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2021 Puja Vidhi)


1. सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला.
2. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
3. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसंच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
4. कलशाच्या आत आंब्याची पानं लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
5. देवीचं स्मरण करताना कलशाचं झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
6. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
7. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
8. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.