Navratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास
Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे.
Budh gochar 2023 / Navratri 2023 : यंदाची नवरात्री ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय खास आहे. नवरात्रीत तब्बल 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग निर्माण झाला आहे. ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, प्रगतीचा कारक बुध ग्रह कन्या राशीतून 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:16 वाजता तूळ राशी प्रवेश करणार आहे. त्यात कन्या राशीत बुध आणि सूर्याची युती झाली आहे. त्यातून बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे 8 राशींच्या लोकांचे भाग्यदयो होणार आहे. (navratri mercury transit auspicious yoga benefits budhaditya rajyoga zodiac sign rain of money Budh gochar 2023)
मकर (Capricorn Zodiac)
नवरात्री मकर राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. नवरात्रीच्या मध्यात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तर व्यावसायिकांना धनलाभ होईल. तुमच्या घरात भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. नोकरदरांना आर्थिक फायदा होणार आहे. तुमच्या कामात यश मिळणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
बुधादित्य राजयोगमुळे तूळ राशीचे लोकांना या महिन्यात धनलाभ होणार आहे. यशाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेचे उपवास केल्याने तुम्हाला अपेक्षित फळ लाभणार आहे. तब्येतीत सुधारणा होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित कोणताही वाद संपुष्टात येणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल.
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. दुर्गा मातेची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि आर्थिक फायदा तुम्हाला होणार आहे. चांगली बातमी कानावर पडणार आहे. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल.
वृषभ (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांना नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेच्या कृपेने आणि बुधादित्य योगामुळे अचानक धनलाभ होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीसोबत, चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्यावर काही महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना माता दुर्गेच्या कृपेने घर आणि वाहनाचे सुख मिळणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभासह गोड बातमी कानावर पडणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
या राशी बुध गोचर खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. समाजात मान-सन्मान प्राप्त होणार आहे. संपत्ती आणि समृद्धी मिळविण्यासाठी हा शुभ काळ असणार आहे. नवरात्रीच्या काळात दान धर्म करणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या उत्पन्नाच्या घरात बुधाच्या संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग तयार झाले आहेत. नवरात्रीच्या काळात व्यवसाय वाढ होणार आहे. हा काळ विशेषतः शुभ ठरणार आहे. करिअरमध्येही प्रगती होणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
या राशीत बुधाचं संक्रमण खूप शुभ ठरणार आहे. हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान आणि सकारात्मक असणार आहे. नवरात्रीच्या काळात धनलाभ दाट शक्यता आहे. घरातील वातावरण शुभ असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)